शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा अभयारण्यात होणार पक्षी निरीक्षण

By admin | Updated: October 3, 2016 02:23 IST

वन्य जीव सप्ताहास उत्साहात प्रारंभ.

अकोला, दि. 0२-अकोला वन्यजीव विभाग, वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित वन्यजीव सप्ताहाचा उद्घाटन समारंभ शनिवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृहात उत्साहात पार पडला. या सप्ताहात काटेपूर्णा अभयारण्यात पक्षी निरीक्षण व श्रमदानातून वनराई बंधार्‍याचे बांधकाम करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष भडांगे तर प्रमुख अतिथी म्हणून वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रकाश लोणकर, ह्यसृष्टीवैभवह्णचे उदय वझे, प्रा. राजा सर, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र तेलकर, संदीप सरडे, सर्पमित्र बाळ काळणे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक सुनील जयस्वाल, वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गाडे व अकोला वनविभागाचे सहायक वनसंरक्षक नितीन गोंडाणे उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्ष म्हणून बोलताना प्रा. सुभाष भडांगे यांनी वनविभागाच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांंंंना पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत जागृत केले. यानंतर उपवनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी वन्यजीव सप्ताहाचे उद्दिष्ट खर्‍या अर्थाने पूर्ण करण्यासाठी वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सर्वांंंंनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विभागामार्फत वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानापोटी वर्षभरात दोन कोटी नुकसानभरपाई अदा करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात येणार नाही, याकरिता सर्वांंंंनी पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सृष्टीवैभवचे उदय वझे यांनी केले. वृक्षारोपणाकरिता ह्यथ्रो सिड्सह्ण या संकल्पना राबविण्यासाठी त्यांनी वृक्ष बियांचे वाटप केले. यानंतर शिवाजी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक राजा सर यांनी ह्यवायुप्रदूषण तथा निसर्ग साखळीतील वन्यजीवांचे महत्त्वह्ण या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले. निसर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने वन्यजीव सप्ताहादरम्यान निसर्गप्रेमींना पक्ष्यांची घरटी वितरित केली जाणार आहेत. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सर्पमित्र मुन्ना खान यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्या त आला. कार्यक्रमाचे संचालन गायत्री देशमुख हिने तर आभार अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. वायाळ यांनी मानले. दुपारच्या सत्रात कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयाचे प्राध्यापक ए. एम. गोरे यांनी पावरपॉइंटच्या माध्यमातून 'सर्पदंश व उपचार' व 'जैवविविधता' या विषयांवर मार्गदर्शन केले.