शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पक्षी निवडणूक : गायबगळा ठरला अकोल्याचा पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:04 IST

अकोला : पहिल्यांदाच झालेल्या पक्षी निवडणूकीत गाय बगळा या पक्षाने पाच हजार १२६ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे या पुढे अकोल्याचा पक्षी म्हणून गाय बगळाची   नवी ओळख निर्माण झाली आहे.

अकोला : पहिल्यांदाच झालेल्या पक्षी निवडणूकीत गाय बगळा या पक्षाने पाच हजार १२६ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे या पुढे अकोल्याचा पक्षी म्हणून गाय बगळाची   नवी ओळख निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात पाच पक्षी असून, त्यासाठी ७० शाळेतील एकूण १७,८८५ विद्यार्थ्यांनी मतदान केले. विद्यार्थ्यांना निसर्गाची जाण व्हावी, तसेच शालेय जिवनातूनच जागरुक मतदार निर्माण व्हावा, या उद्देशाने अकोल्यात पहिल्यांदाच पक्षी निवडणूक घेण्यात आली. १५ ते २३ जानेवारी या कालावधीमध्ये विविध शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये पाच पक्षांमध्ये लढत झाली. यामध्ये राखी मनेष, हप्पू , सुमग, गायबगळा व काळा शराटी या पक्षांचा समावेश होता. गत आठवड्याभरात शहरातील ७० शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान केले. निसर्ग कट्टा व निवडणूक विभागातर्फे या शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वर्यावरण व मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. जनजागृतीसोबतच विद्यार्थ्यांकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या पक्षांसाठी मतदान करवून घेतले. या मतदानाचा निकाल राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार २५ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात जाहिर करण्यात आला. त्यानुसार, गाय बगळा या पक्षाने पाच हजार १२६ मतांची आघाडी घेत अकोल्याचा पक्षी म्हणून मान मिळवला. पक्षी निवडणुकीसाठी निसर्ग कट्टा, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र पक्षी मित्र, आधार फाउंडेशन , अंजिक्य साहसी क्लब, मॅराथॉन नेचर क्लब, खंडेलवाल महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, आरएलटी महाविद्यालय व सृष्टी वैभव या संस्थांसह पक्षी मित्र दीपक जोशी, उदय वझे, देवेंद्र तेलकर, संदीप साखरे, संदीप सरडे, अतुल जवळेकर, अजय फाळे यांनी सहकार्य केले.असे पडले मतपक्षी -                        मिळालेले मतगाय बगळा                    ५१२६सुबग                             ५०३३हप्पू                              ३६७५काळा तराटी                  २०८३राखी धनेश                   १९६५पाच वर्षांसाठी निवडपहिल्यांदाच झालेल्या या पक्षी निवडणुकीत विजयी उमेदवार गाय बगळा हा पुढील पाच वर्षांसाठी अकोल्याचा पक्षी राहणार आहे. पुढच्या पाच वर्षानंतर पुन्हा पाच पक्षांमध्ये या प्रकारची निवडणूक लढविण्यात येणार आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूकNatureनिसर्ग