शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पैदास व्यवस्थापनात जैव तंत्रज्ञान गरजेचे - डॉ. एम.एस. चौहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:47 IST

Biotechnology in breeding management जैव तंत्रज्ञान आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय दूध संशोधन केंद्राचे निदेशक तथा कुलगुरू डॉ. एम. एस. चौहान यांनी व्यक्त केले.

अकोला : दूध उत्पादनात भारत जागतिक स्तरावर अव्वल क्रमांक असला तरी गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाची निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी पशुविज्ञान क्षेत्रात पैदास व्यवस्थापनासह जैव तंत्रज्ञान आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय दूध संशोधन केंद्राचे निदेशक तथा कुलगुरू डॉ. एम. एस. चौहान यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला यांचे वतीने दिनांक २ ते ६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान आयोजित "दुधाळ पशूंमध्ये प्रजनन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी अत्याधुनिक जैव तंत्रज्ञान" या संकल्पनेवर आधारित पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.दुध उत्पादन वाढीसाठी व शाश्वत दुध व्यवसायासाठी कालवडीचा वयात येण्याचा कालावधी तसेच दोन वितातील अंतर कमी करण्या बरोबर जनावर विण्याच्या सुमारास उत्तम आरोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यानी अधोरेखीत केले. प्रशिक्षण समारोप प्रसंगी प्रा डॉ माणिक तांदळे, अधिष्ठाता, कर्नाटक पशुवैदयकीय विद्यापीठ, बिदर व प्रा डॉ नितीन कुरकुरे, संशोधन संचालक , माफसू नागपूर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षण समन्वयक डॉ. महेश इंगवले यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजना मागील भूमीका स्पष्ट केली. तर प्रा डॉ चैतन्य पावशे यानी मान्यवरांसह प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विविध राज्यातील एकूण २४० विद्यार्थी, पशुवैद्यकीय अधिकारी, संशोधक आदींचे स्वागत केले.

सदर प्रशिक्षणात प्रा डॉ. मो.अमीन बेग (सौदी अरेबिया), डॉ. संजीव चौबळ (अमेरिका), डॉ पांडूरंग नेटके (ऑस्ट्रेलिया), डॉ. कुमरेसन (बंगळुरू), डॉ. होनपारखे (पंजाब), डॉ. सुनील जाधव (बरेली), डॉ. बी.एन.सुतार (गुजरात), डॉ. एस. संतोष कुमार, डॉ सेल्वराजू (तामिळनाडू),डॉ. मुरुगवेल (पाँडिचेरी),डॉ. टि.के. मोहंती ( हरियाना), डॉ. प्रदीप महाजन आणि डॉ. जयंत खडसे (पुणे) आदी व्याख्यात्यांनी पशुप्रजनन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान संबंधी विविध विषयावर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संचालन डॉ. प्रवीण बनकर तर आभार प्रदर्शन डॉ. श्याम देशमुख यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सुनील वाघमारे, डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी तर तांत्रिक सहकार्य नॉलेज पार्टनर असलेल्या आलेम्बिक फार्माचे पी. करुणानिथी, डॉ. संतोष शिंदे, डॉ.नरेश कुलकर्णी व चमूने परिश्रम घेतले.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र