साखरखेर्डा (बुलडाणा) : वाशिमकडून साखरखेर्डा येथे परत येत असताना मालेगाव- मेहकर रोडवर मोटारसायकलला कंटेनरने जबर धडक दिली. त्यामध्ये साखरखेर्डा येथील रहिवासी शिक्षक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारला रात्रीदरम्यान घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, साखरखेर्डा येथील रहिवासी आणि देऊळगाव माळी जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक नामदेव खिल्लारे यांचा मुलगा जीवक खिल्लारे हा काही महिन्यांपूर्वी वाशिम येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर रुजू झाला होता. १ डिसेंबर रोजी शाळेचे कामकाज आटोपून एम.एच.२८ डब्ल्यू ९६९२ क्रमांकाच्या मोटारसायकलने तो साखरखेर्डा येथे परत येत होता. दरम्यान, मालेगाव-मेहकर रोडवर पांग्री कुटे गावाजवळ एका मालवाहू कंटेनरने जीवक खिल्लारे याच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. या अपघातात जीवक हा जागीच ठार झाला. वाशिम येथे त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मंगळवारला दुपारी २ वाजता साखरखेर्डा येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: December 3, 2014 00:33 IST