शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

 ‘बीएचआर’च्या संचालिका ‘सीआयडी’च्या जाळय़ात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:53 IST

अकोला : शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेतील तब्ब्ल चार कोटी रुपयांच्या ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अकोला येथील पथकाने शनिवारी या पतसंस्थेच्या संचालिकेस ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी सीआयडीने या संचालिकेची कसून चौकशी सुरू केली आहे. ललिता सोनोने असे या संचालिकेचे नाव आहे.

ठळक मुद्दे‘बीएचआर’ घोटाळा प्रकरणअकोल्यात झाली चौकशीराज्यभरातील शाखांमध्ये घोळ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेतील तब्ब्ल चार कोटी रुपयांच्या ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अकोला येथील पथकाने शनिवारी या पतसंस्थेच्या संचालिकेस ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी सीआयडीने या संचालिकेची कसून चौकशी सुरू केली आहे. ललिता सोनोने असे या संचालिकेचे नाव आहे.अकोला शहरासह जिल्हय़ातील शेकडो ठेवीदारांची भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेत ३ कोटी ९७ लाख ६४ हजार ९४९ रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. शेकडो ठेवीदारांनी या पतसंस्थेच्या विविध आकर्षक योजनांवर विश्‍वास ठेवत तब्बल चार कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र, त्यानंतर या ठेवींचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिक रक्कम मिळणार असल्याने ठेवीदारांनी पैसे परत घेण्यासाठी पतसंस्थेत मागणी सुरू केली; परंतु पतसंस्थेने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अकोल्यातील शेकडो ठेवीदारांची भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेत ३ कोटी ९७ लाख ६४ हजार ९४९ रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले. पैसे परत मिळत नसल्याने काही ठेवीदारांनी बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध पोलिसात धाव घेतली. गजानन धामांडे यांच्या तक्रारीवरून या गैरव्यवहारात जबाबदार असलेल्या ३४ संचालकांविरुद्ध २३ फेब्रुवारी २0१६ रोजी सिटी कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४0९, ४२0, १२0 ब आणि एमपीएआयडी १९९९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस प्रकरणाचा तपास करीत असतानाच या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अकोला येथील पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर बीएचआरच्या संचालिका ललिता सोनोने यांना शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. या  गैरव्यवहार प्रकरणात सदर संचालिकेची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सीआयडीच्या अधिकार्‍यांनी दिली.

राज्यभरातील शाखांमध्ये घोळबीएचआर पतसंस्थेच्या राज्यभरातील शाखांमध्ये ठेवीदारांच्या ठेवी परत न देता, यामध्ये मोठा गैरव्यवहार संस्थेच्या ३४ संचालकांनी केला आहे. हा घोळ अकोल्यातील शाखेसह राज्यभरातील शाखांमध्ये करण्यात आला असून, कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडविण्यात आल्या आहेत. यामध्ये काही संचालकांना यापूर्वीच अटक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, सोनोने यांना शनिवारी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.