शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भोंदु बाबाचा विवाहितेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:28 IST

तेल्हारा (जि. अकोला): पतीसाठी औषध मागायला आलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेवर पंचगव्हाण येथील भोंदु बाबाने बलात्कार केल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी घडली.

ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथील घटना भोंदू बाबा अटकेत

तेल्हारा (जि. अकोला): पतीसाठी औषध मागायला आलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेवर पंचगव्हाण येथील भोंदु बाबाने बलात्कार केल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी घडली. विवाहितेच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी भोंदु बाबाविरुद्ध १४ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.तालुक्यातील पंचगव्हाण येथील नईम बाबा हा विविध आजारावर करणीचे, टुक, भूतबाधा आदीवर उपचाराची बतावणी करून ग्रामस्थांची दिशाभूल करीत होता. या बाबाकडे आपल्या पतीसाठी औषध आणालयला तळेगाव बाजार येथील एका १९ वर्षीय विवाहिता १२ आॅक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या गेली होती. त्यावेळी बाबाने विवाहितेच्या पतीला बाहेर पाठवले. तसेच तुझ्या पतीच्या अंगात भूत असून तो काढण्यासाठी तुला काही त्याग करावा लागेल असे सांगितले. तसेच खोलीचा परदा बंद करून विवाहितेवर बलात्कार केला.विवाहितेने विरोध केला बाबाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घरी कुणालाही न सांगता पीडिता रडत होती. त्यांनी विचारल्यावर हिंमत करून विवाहितेने तेल्हारा पो. स्टे. मध्ये तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय संतोष गवळी, संतोष केदासे, सागर मोरे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)दर गुरुवारी भरत होता दरबारनईम बाबा याचा पंचगव्हाण येथे दर गुरुवारी दरबार भरत होता. या दरबारात हा बाबा भूत, करणी व इतर आजारांवर उपचार करीत असे. तसेच रुग्णांना औषधीही लिहून देत होता. या दरबारात २०० ते २५० महिलांसह पुरुषही सहभागी होत होते.अंधश्रद्धेतून आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याचे तपासात उघड होउ शकते.बाबांच्या बचावसाठी भक्तांचा दबावभोंदु बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करून यासाठी या बाबाच्या भक्तांनी तेल्हारा पोलिस स्टेशन गाठले होते. १०० लोकांच्या जमावाने गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. तसेच या जमावाने विवाहितेवर तक्रार न देण्यासही दबाव आणला. परंतु, विवाहिता आपल्या फिर्यादीवर ठाम राहिल्याने तेल्हारा पोलिसांनी भोंदु बाबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फोटो

टॅग्स :Rapeबलात्कार