शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

भारिपला फटका, शिवसेनेचा सफाया!

By admin | Updated: October 20, 2014 02:01 IST

अकोला जिल्ह्यात काँग्रेस, राकाँची पाटी जिल्ह्यात कोरीच; पाचपैकी चार जागा एकट्या भाजपला.

अकोला : मोदी लाटेवर स्वार होत भाजपने अकोला जिल्ह्यात मुसंडी घेत ५ पैकी ४ मतदारसंघात विजय मिळविला. भाजपच्या मुसंडीपुढे शिवसेनेचा जिल्ह्यात सफाया झाला. सेनेने आकोटची एकमेव जागाही गमाविली. भाजपच्या लाटेत भारिप-बमसंला फटका बसला. या पक्षाने अकोला पूर्वची जागा गमाविली तर बाळापूरचा गड राखण्यात यश मिळविले. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात पाच मतदारसंघात १५ ऑक्टोबर रोजी ७९९३९३ मतदारांनी ९३ उमेदवारांना मतदान केले होते. मतमोजणी रविवारी सकाळी ८ वाजतापासून सुरू झाली. दुपारी १.३0 वाजेपर्यंंंत पाचही मतदारसंघातील निकाल जाहीर झाले. भाजपने पाचपैकी आकोट, अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम आणि मूर्तिजापूर या चार मतदारसंघात विजय मिळविला. बाळापूरचा गड भारिपने कायम राखला. विद्यमान आमदारांपैकी गोवर्धन शर्मा, हरीश पिंपळे आणि बळीराम सिरस्कार पुन्हा निवडून आले आहेत. शेवटच्या क्षणी आकोटमधून भाजपचे तिकीट मिळाल्यानंतरही प्रकाश भारसाकळे यांनी काँग्रेसचे महेश गणगणे यांचा ३१४११ मतांनी पराभव केला. जिल्ह्यात पाचही मतदारसंघात सर्वाधिक ७00८६ मतं भासरकाळे यांना मिळाले. बाळापूर मतदारसंघात काँग्रेस आणि भारिपमध्ये चुरशीची लढत झाली. यात विद्यमान आमदार सिरस्कार यांनी बाजी मारून ६९३९ मतांनी विजय मिळविला. अकोला पूर्व मतदारसंघात सर्वाधिक चुरशीची लढत बघावयास मिळाली. सर्वाधिक २५ उमेदवार असलेल्या या मतदारसंघात आधी शिवसेना तर नंतर भारिपचे विद्यमान आमदार हरिदास भदे यांनी आघाडी घेतली होती. शेवटी भाजपचे रणधीर सावरकर यांनी २४४0 मतांनी विजय मिळवित सर्वांंंनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. अकोला पश्‍चिममध्ये भाजपचे गोवर्धन शर्मा यांनी पाचव्यांदा विजय मिळविला. काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर रात्रीतून राकाँच्या गोटात सामिल झालेले विजय देशमुख यांच्यावर शर्मा यांनी ३९९५३ मताधिक्य घेत विजय मिळविला. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनी १२८८८ मतांनी विजय मिळविला.