शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

अकोला जिल्हा परिषदेवर भारिपचा झेंडा; अध्यक्षपदी प्रतिभा भोजने, उपाध्यक्षपदी सावित्री राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 3:48 PM

क्रवारी झालेल्या निवडणुकीत भारिप-बमसंच्या प्रतिभा भोजने अध्यक्षपदी, तर सावित्री राठोड उपाध्यक्षपदी निवडून आल्या.

अकोला : जिल्हा परिषदेत गेल्या २० वर्षापासून सत्तेत असलेल्या भारिप-बमसंने यावेळीही सत्ता कायम ठेवली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रीयेत भाजपच्या ७ सदस्यांनी बहिर्गमन केले. सभागृहात २५ विरूद्ध २१ मतांनी अध्यक्षपदी प्रतिभा बापुराव भोजणे, उपाध्यक्षपदी सावित्री हिरासिंग राठोड यांची निवड झाली. महाआघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार गोपाल दातकर, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील धाबेकर पराभूत झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बमसंचे सर्वाधिक २३ सदस्य विजयी झाले. तर दोन अपक्षही त्यांना सामिल झाले. त्यांची संख्या २५ असताना जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीचेही प्रयत्न सुरू झाले. शिवसेनेचे १३, काँग्रेस-४, राष्ट्रवादी-३ एक अपक्ष मिळून ही संख्या २१ होती. त्यांना भाजपचे पाठबळ मिळेल, या अपेक्षेने भाजपसोबत चर्चा झाली. त्यानुसार अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे गोपाल दातकर, काँग्रेसचे सुनील धाबेकर तर उपाध्यक्षपदासाठीही त्या दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले. निवड प्रक्रीयेचा सुरूवात होण्यापूर्वी धाबेकर यांनी अध्यक्षपदाचा तर दातकर यांनी उपाध्यक्षपदाची अर्ज मागे घेतला. भाजपच्या गटनेत्या माया कावरे यांच्यासह सात सदस्यांनी निवड प्रक्रीयेला सुरूवात होण्यापूर्वी उपस्थिती नोंदवहीत स्वाक्षरी करीत सभागृहातून बहिर्गमन केले. त्यावेळी सभागृहात एकुण ४६ सदस्य उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी भारिप-बमसंच्या प्रतिभा बापुराव भोजणे व शिवसेनेचे गोपाल दातकर यांच्यात लढत झाली. उपाध्यक्षपदासाठी भारिप-बमसंच्या सावित्री राठोड व काँग्रेसचे सुनील धाबेकर यांच्यात लढत झाली. भारिपच्या उमेदवारांना २५ तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना २१ मते मिळाली. महाविकास आघाडीमध्ये अपक्ष सदस्य गजानन पुंडकर यांचाही सहभाग होता. विशेष सभेचे पिठासीन अधिकारी नरेंद्र लोणकर, सहाय्यक अधिकारी सूरज गोहाड यांनी निवड प्रक्रीया पूर्ण केली. 

टॅग्स :Akola ZPअकोला जिल्हा परिषदBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ