शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंचा बंद

By admin | Updated: May 20, 2017 01:28 IST

अकोला : महापालिका प्रशासनाने अवाजवी कर वाढ केल्याचा आरोप करीत मनपातील भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी पुकारलेल्या जठारपेठ बंदला व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला.

व्यावसायिकांचा संमिश्र प्रतिसादलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने अवाजवी कर वाढ केल्याचा आरोप करीत मनपातील भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी पुकारलेल्या जठारपेठ बंदला व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. पक्षाच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारनंतर व्यावसायिकांनी दुकाने पूर्ववत सुरू केल्याचे दिसून आले. महापालिका प्रशासनाने शहरातील मालमत्तांचे पहिल्यांदाच ‘जीआयएस’ प्रणालीच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. मालमत्तांचे अचूक मोजमाप केल्यानंतर ३० ते ६० टक्क्यांपर्यंत कराच्या रकमेत वाढ केली. ही वाढ अवास्तव असून, यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांवर अतिरिक्त बोजा पडत असल्याचे स्पष्ट करीत महापालिकेच्या करवाढीला मनपातील विरोधी पक्ष भारिप-बमसंने विरोध दर्शविला. कर वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव, नगरसेविका किरण बोराखडे, नगरसेवक बबलू जगताप यांनी १९ मे रोजी जठारपेठ परिसर बंदची हाक दिली होती. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत परिसरातील व्यावसायिक त्यांची दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवतील, असे भारिपच्या वतीने नमूद करण्यात आले होते. भारिपने बंद पुकारल्यानंतर दुपारनंतर व्यावसायिकांनी त्यांची प्रतिष्ठाने, दुकाने पूर्ववत सुरू केल्याचे दिसून आले. परिसरातील व्यावसायिकांनी बंदला संमिश्र प्रतिसाद दिला.स्वाक्षरी मोहीम राबविली!करवाढीच्या मुद्यावर नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी भारिप-बमसंच्या वतीने जठारपेठ भागात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यावेळी गटनेत्या धनश्री देव, नगरसेविका किरण बोराखडे, नगरसेवक बबलू जगताप, डॉ. राजकुमार रंगारी, प्रतिभा अवचार, अरुंधती शिरसाट, वंदना वासनिक, विजय वाघ, दिलीप देशपांडे, बबलू तिवारी, भीमराव तायडे आदी उपस्थित होते.