शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

भारिप-बमसंचा घेराव; भाजपाने केले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 20:02 IST

अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने अवाजवी  करवाढ केल्याच्या निषेधार्थ भारिप-बमसंने भाजपा  पदाधिकार्‍यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव  घालण्याचा इशारा दिला होता. त्यानुषंगाने शुक्रवारी  सकाळी भारिपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी महापौर  विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती  सभापती बाळ टाले यांच्या निवासस्थानी धडक दिली अस ता, भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांचे यथोचित  स्वागत करीत निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देकरवाढीच्याविरोधात भारिपचे आंदोलनपदाधिकार्‍यांच्या निवासस्थानी जाऊन दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने अवाजवी  करवाढ केल्याच्या निषेधार्थ भारिप-बमसंने भाजपा  पदाधिकार्‍यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव  घालण्याचा इशारा दिला होता. त्यानुषंगाने शुक्रवारी  सकाळी भारिपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी महापौर  विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती  सभापती बाळ टाले यांच्या निवासस्थानी धडक दिली अस ता, भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांचे यथोचित  स्वागत करीत निवेदन स्वीकारले.सर्वसामान्य अकोलेकरांना मूलभूत सुविधांची पूर्तता न कर ता सत्ताधारी भाजपाने प्रचंड प्रमाणात करवाढ केली. यामुळे  अकोलेकरांवर आर्थिक बोजा निर्माण झाल्याचा आरोप  करीत विरोधी पक्ष भारिप-बहुजन महासंघाने सत्ताधार्‍यांसह  प्रशासनाविरोधात विविध आंदोलने छेडली होती. १९  ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सभागृहात आयोजित केल्या  जाणार्‍या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांनी एकूण कर  रकमेच्या दहा टक्के रक्कम सूट देण्याचा विषय पटलावर घे तला आहे. प्रशासनाने संपूर्ण करवाढ रद्द करण्याची मागणी  भारिप-बमसंने केली असून, सर्वसाधारण सभेपूर्वी १८  ऑगस्ट (शुक्रवार) रोजी सत्ता पक्षातील प्रमुख  पदाधिकार्‍यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव  घालण्याचा निर्णय भारिपने घेतला होता. त्यानुषंगाने भारि पच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नियोजनानुसार महापौर  विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती  सभापती बाळ टाले यांच्या निवासस्थानी धाव घेतली अस ता, भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांचे यथोचित  स्वागत केल्यामुळे काही क्षणासाठी आंदोलनकर्तेही  बुचकळ्यात पडल्याचे चित्र होते. भारिपचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुच्र्या, चहा, नाश्त्याची व्यवस् था करण्यात आल्याचे यावेळी दिसून आले. अशा  खेळीमेळीच्या वातावरणात भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी  निवेदनाचा स्वीकार केला, हे येथे उल्लेखनीय. 

उपमहापौर, सभापतींना निवेदन उपमहापौर वैशाली शेळके यांना जिल्हा परिषद अध्यक्ष  संध्या वाघोडे, माजी मंत्री दशरथ भांडे, माजी जि.प. अध्यक्ष  बालमुकुंद भिरड, नगरसेविका किरण बोराखडे, प्रा.  प्रसन्नजित गवई, बुद्धरत्न इंगोले यांनी निवेदन दिले. स्थायी  समिती सभापती बाळ टाले यांना नगरसेवक बबलू जगताप  व इतर कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले. भारिपने केलेल्या  नियोजनानुसार अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी  आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. 

महापौरांची अनुपस्थितीमहापौर विजय अग्रवाल यांना निवेदन देण्याची जबाबदारी  आ.बळीराम सिरस्कार, माजी आ.हरिदास भदे, कार्याध्यक्ष  काशीराम साबळे, प्रतिभा अवचार, मनपातील गटनेत्या  अँड.धनश्री देव, जि.प. सभापती देवकाबाई पातोंड, शोभा  शेळके, सरला मेश्राम, डॉ. राजकुमार रंगारी, माजी  नगरसेविका वंदना वासनिक, गजानन गवई, सुनील जगता प यांच्याकडे होती. महापौर अग्रवाल बाहेरगावी  असल्यामुळे त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका सुनीता  अग्रवाल यांनी निवेदन स्वीकारले.