शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: शेतकरी आंदाेलनात बलिदान दिलेल्या सीताबाईंचे पती व मुलीही पदयात्रेत

By राजेश शेगोकार | Updated: November 15, 2022 12:43 IST

Bharat Jodo Yatra: देशात झालेल्या शेतकरी कायद्याविराेधातील आंदाेलनात ज्यांनी  बलिदान दिले, त्या शेतकरी नेत्या सीताबाई तडवी यांचे पती व दाेन्ही मुली या पदयात्रेत सहभागी हाेणार आहेत. 

- राजेश शेगाेकार अकाेला : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जाेडाे यात्रा आज १५ नाेव्हेंबर राेजी विदर्भात दाखल हाेत आहे. या यात्रेचा विदर्भातील प्रवास हा अनेक अंगांनी महत्त्वाचा ठरणार असून, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे दु:ख राहुल गांधी समजून घेणार आहेतच, शिवाय देशात झालेल्या शेतकरी कायद्याविराेधातील आंदाेलनात ज्यांनी  बलिदान दिले, त्या शेतकरी नेत्या सीताबाई तडवी यांचे पती व दाेन्ही मुली या पदयात्रेत सहभागी हाेणार आहेत. 

दिल्लीच्या वेशीवर  झालेल्या शेतकरी आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील आंबाबरी गावातील सीताबाई तडवी  सहभागी झाल्या हाेत्या.  १६ जानेवारी २०२१ पासून दिल्लीतील शहाजापूर सीमेवरील शेतकरी आंदोलनात  त्यांनी भाग घेतला. त्या २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्येही सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर  नंदुरबारला परतत असताना कडाक्याच्या थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

सीताबाई तडवी यांनी शेतकरी कायद्यांविराेधातील आंदाेलनात आपले बलिदान दिले. त्यांची स्मृती व याेगदानासाेबतच शेतकऱ्यांचे प्रश्न या पदयात्रेच्या निमित्ताने समाेर यावे, याकरिता त्यांचे पती रामदास व दाेन्ही मुली या पदयात्रेत सहभागी हाेत आहेत.

काेण आहेत सीताबाई? सीताबाई तडवी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या त्या सहकारी होत्या. तसेच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी मोर्चात भागही घेतला होता. लोकसंघर्ष मोर्चाचे उलगुलान आंदोलन, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी संघर्ष, अशा अनेक मोर्चांत त्या नेहमी अग्रेसर असत. 

मेधा पाटकर, श्याम मानव यांचा सहभागनर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांच्यासह अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी पदयात्रेत सहभागी हाेत आहेत. पातूर ते शेगावदरम्यान हे मान्यवर राहुल गांधी यांच्यासमवेत पदयात्रा करणार आहेत.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAkolaअकोला