शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : आपल्याला लाॅटरी लागली आहे, असा मॅसेज किंवा ई-मेल आल्यास आपली फसवणूक हाेण्याची शक्यता नाकारता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : आपल्याला लाॅटरी लागली आहे, असा मॅसेज किंवा ई-मेल आल्यास आपली फसवणूक हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर सेल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात वेळाेवेळी हाेत असलेल्या जनजागृतीमुळे अशा घटना घडलेल्या नसल्या, तरी इतर ठिकाणी घडत असलेल्या घटना पाहता, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच लाॅटरी लागल्याचा मॅसेज किंवा फाेन आल्यास संपर्क करावा.

लाटरी लागली, म्हणून जिल्ह्यात फसवणूक नाही

जिल्ह्यात सायबर सेल विभागाकडून सायबर गुन्ह्यांसंदर्भात वेळाेवेळी शिबिरे, मार्गदर्शन करण्यात येत असल्याने लाॅटरी लागली, म्हणून जिल्ह्यात फसवणूक झाल्याचे एकही प्रकरण नाही. नागरिकांनी लाॅटरी लागली, असे मॅसेज आल्यास सावधानता बाळगावी.

आपल्याला लाॅटरी लागली आहे, असा मॅसेज किंवा ई-मेल आल्यानंतर अनेक शहरांमध्ये माेठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यापासून सावध राहण्यासाठी काेणत्याही फेक मॅसेज, ई-मेलला थारा देऊ नये, असे आवाहन सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

वेबसाइटची सुरुवात एचटीटीपीएसपासून झाली आहे का?

वेबसाइटची सुरुवात एचटीटीपीएसपासून सुरू झाली आहे का, हे सर्वात आधी तपासून मेल चेक करणे गरजेचे आहे.

वेबसाइटची सुरुवात एचटीटीपीएसपासून सुरू झाली नसल्याने, आपली फसवणूक हाेत असल्याचे लक्षात घेऊन मेल ओपन करणे टाळावे.

फिशिंग ई-मेल

एखाद्या कंपनीच्या नावाने ई-मेल्स किंवा मेसेज पाठविले जातात. (फिशिंग इमेल) असे मेल ओपन करून, त्यांना प्रतिसाद देणे टाळणे गरजेचे आहे, अन्यथा आपला पासवर्ड, पिन चाेरी करून फसवणूक केली जाऊ शकते.

ही घ्या काळजी

एखाद्या बनावट कंपनीच्या नावाने फिशिंग मेल पाठविल्या जातो. त्यामध्ये ‘खूशखबर! आपण १० लाखाची लाॅटरी जिंकली’ असे प्रलाेभन देण्यात येते. यापासून सावधान राहावे, असा काेणत्याही प्रकारचा मेल आल्यास त्याची शहनिशा करणे गरजेचे आहे, अन्यथा फसवणूक हाेऊ शकते. लाॅटरी लागली, असा मॅसेज किंवा फाेन आल्यास काेणत्याही प्रकारची माहिती देण्याचे टाळावे, तसेच शंका असल्यास सायबर सेलकडे तक्रार नाेंदवावी.