शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार डुकरांना हात लावाल तर!

By admin | Updated: July 13, 2017 01:27 IST

सत्ताधारी भाजपावर वराह पालक, सफाई कर्मचाऱ्यांचा दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आमच्या मालकीच्या डुकरांना हात लावाल तर याद राखा, अशा शब्दांत वराह पालकांसह महापालिकेतील काही सफाई कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराला धाकदपट करण्यासोबतच सत्ताधारी भाजपावरसुद्धा दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. वराह पालकांच्या दबावासमोर झुकल्यामुळेच मनपाच्यावतीने सुरू झालेली डुकरे पकडण्याची मोहीम तीन दिवसांपासून ठप्प पडल्याचे चित्र समोर आले आहे. शहरावर जीवघेण्या ‘स्वाइन फ्लू’चे संकट घोंगावत आहे. डुकरांच्या माध्यमातून या आजाराचा विषाणू पसरत असल्याची जाणीव असतानासुद्धा शहरात चक्क १६ ते १७ हजार डुकरांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट डुकरांमुळे घाणीच्या समस्येत भर पडली असून, सर्वपक्षीय नगरसेवकांनी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर केला आहे. स्थानिक वराह पालकांच्या दबावतंत्रामुळे डुकरांना पकडण्यासाठी कोणीही तयार होत नसल्याचे पाहून एका कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील २० जणांचे पथक अकोल्यात आणण्यात आले. डुकरे पकडण्याच्या पहिल्याच दिवशी स्थानिक वराह पालकांनी एकत्र येत कंत्राटदाराला धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ८ जुलैपासून बंद पडलेली ही मोहीम अद्यापही सुरू झाली नसल्यामुळे महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नगरसेवक गेले कुठे?डुकरांच्या उच्छादामुळे प्रभागात घाण, अस्वच्छतेला हातभार लागत असून, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन कुचकामी ठरल्याची ओरड सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवक करतात. स्थानिक वराह पालक, मनपा सफाई कर्मचारी जेव्हा मनपाच्या मोहिमेला बंद पाडतात, त्यावेळी मात्र नगरसेवक पुढाकार न घेता चुप्पी साधत असल्याचे चित्र दिसत आहे.पोलिसांचेही असहकार्य!खदान, कैलास टेकडी, दुर्गा चौक आदी भागातील ५० ते ६० जणांनी डुकरे पकडणाऱ्या कंत्राटदाराला धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मनपाच्यावतीने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ८ जुलै रोजी तक्रार देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक क रणे अपेक्षित होते.पदाधिकाऱ्यांची मध्यस्थीडुकरे पकडण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला स्थानिक वराह पालकांना सूचना केल्या. मनपातील सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून तीन वेळा निविदा प्रकाशित केली. वराह पालकांच्या दबावामुळे निविदा प्राप्त न झाल्यामुळे मध्य प्रदेशातील २० जणांच्या चमूला पाचारण करावे लागले. ८ जुलै रोजी शहरात डुकरे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात होताच सायंकाळी सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत प्रशासनाला ही मोहीम थांबवण्याची विनंती केली. दोन दिवसांत शहरातील डुकरांची विल्हेवाट लावण्याचे प्रशासनाला आश्वासन दिले.