शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकप सामन्यावर लाखोंचा सट्टा! भारतीय संघावर सर्वात कमी रेट, प्रतिस्पर्धी संघ खातोय भाव

By नितिन गव्हाळे | Updated: November 19, 2023 18:12 IST

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा फिवर सट्टाबाजारातही दिसून आला.

अकोला: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा फिवर सट्टाबाजारातही दिसून आला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यावर अकोला शहरात लाखो रूपयांची उलाढाल झाली. भारताचा डाव सुरू झाल्यावर सलामीवीर रोहित शर्मा, चौकार, षटकारांची आतषबाजी करीत असताना, सटोडियांनी भारतीय संघाला झुकते माप दिले होती. सुरूवातीला भारतीय संघावरील रेट हा १ रूपया २५ पैसे होता. नंतर मात्र, विकेट पडल्यानंतर भारताचा भाव सायंकाळी ५. ३० वाजेपर्यंत ७३ पैशांवर आला तर ऑस्ट्रेलिया संघावरील भाव ७५ पैसे झाला होता. सामना सुरू झाल्यावर सटोडियांनी भारतीय संघालाच विजयाचे दावेदार मानले होते. 

त्यात ऑस्ट्रेलियाचा दर हा ६० पैसे एवढा कमी दिला होता. सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी डावाची सुरूवात केल्यानंतर षटकार, चौकार येत असल्याने, भारतीय संघावरील रेट १ रूपया २५ पैशांवर पोहोचला. शुभमन गिलची विकेट पडल्यानंतरही हा रेट कायम होता. पण रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर भारतीय संघावरील रेट कमी होत गेला. धावगतीही मंदावल्यावरही विराट कोहली खेळपट्टीवर असल्याने, १ रूपया १५ पैशांपर्यंत रेट कायम हाेता. त्यानंतर विराटची विकेट गेल्यानंतर हा रेट एकदम ७३ पैशांवर आला आणि ऑस्ट्रेलियाचा रेट वधारून ७५ पैशांवर गेला. त्यानंतर मात्र, विकेटामागून विकेट गेल्यामुळे भारतीय संघावरील सट्ट्याचा रेट ६० पैशांवर आला होता. अकोल्यातील सटोडिया ऑनलाइन पद्धतीने सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर खायवाडी करीत होते. खेळातील प्रत्येक चेंडूनुसार सट्ट्याचा रेट बदलत असताना दिसत होता. भारतीय संघाच्या डावाप्रमाणेच सट्टाबाजारही खाली-वर होताना दिसत होता. परंतु काहींनी भारतीय संघाची आशा सोडलेली नाही. त्यांना भारत विजयी होईल. अशी आस आहे आणि सट्ट्याचा रेट एकदम उसळी घेईल. या विश्वासावर अनेकजण ऑनलाइन सट्टा खेळत असल्याची माहिती आहे.

कशी होते खायवाडी...विश्वचषक क्रिकेटच्या भारत व ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या अंतिम सामन्यावर लाखो रूपयांचा ऑनलाइन सट्टा लावला जात आहे. यासाठी अनेक बुकी, सटोडिये सक्रिय होतात. क्रिकेट सट्ट्यातील एका जाणकाराने याबाबत माहिती दिली की, ५.३० वाजेपर्यंत भारतीय संघाचा रेट हा ७३ पैसे तर ऑस्ट्रेलिया संघाचा रेट ७५ पैसे आहे. यात चढउतार होऊ शकतो. एखाद्याने भारतीय संघावर ७३ पैशांनी एक लाख किंवा १० हजार रूपये लावले आणि भारत स्पर्धेत विजयी ठरला तर त्याला १ लाखावर ७३ हजार रूपये आणि १० हजारावर ७ हजार ३०० रूपये मिळू शकतात. हरला तर त्याचे नुकसान होऊ शकते. हीच बाब ऑस्ट्रेलिया संघावरील सट्ट्याच्या बाबतीतही लागू पडत असल्याचे त्या जाणकाराने सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया