शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
3
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
4
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
5
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
6
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
7
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
8
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
9
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
10
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
11
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
12
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
13
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
14
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
15
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
16
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्र देशात चवथे

By atul.jaiswal | Updated: June 8, 2019 16:41 IST

महानिर्मितीच्या ५०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे.

ठळक मुद्देयापूर्वी नुकतेच मे २०१९ मध्ये पारस वीज केंद्र सहाव्या क्रमांकावर होते.पारस वीज केंद्र मात्र, कोळसा खाणीपासून किमान ३०० किलोमीटर दूर अंतरावर आहे. महानिर्मितीमध्ये क्रमांक एकचे विद्युत केंद्र म्हणून या केंद्राचा नावलौकिक आहे.

अकोला : केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून, त्यामध्ये महानिर्मितीच्या ५०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे २०१९ मध्ये पारस वीज केंद्र सहाव्या क्रमांकावर होते.सर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र मध्यप्रदेश (प्रथम-१००.०४ भारांक), एन.टी.पी.सी., तालचर ओरिसा (द्वितीय-९८.५२ भारांक), रिलायन्स ससान सिंगारोली मध्यप्रदेश (तृतीय -९७.८२ भारांक) तर महानिर्मिती पारस वीज केंद्र (९६.९३ भारांक) असा क्रम आहे.सर्वोत्तम कामगिरी करणारे वरील तालचर,ससान हि दोन औष्णिक विद्युत केंद्र कोळसा खाणीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोळसा वहन खर्चात मोठी बचत होते व कोळसा सहज उपलब्ध होतो. पारस वीज केंद्र मात्र, कोळसा खाणीपासून किमान ३०० किलोमीटर दूर अंतरावर आहे. पारस वीज केंद्राला वेकोलि, महानदी कोल फिल्ड्स आणि एस.ई.सी.एल. च्या खाणींतून कोळसा पुरवठा करण्यात येतो. विविध तांत्रिक समस्यांवर वेळेत मात करून येथील कुशल मनुष्यबळाने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा/कौशल्याचा परिचय दिला आहे.महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(वित्त) संतोष अंबेरकर, संचालक(खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, संचालक(प्रकल्प) वी. थंगपांडियन तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाने मुख्य अभियंता डॉ. रविंद्र गोहणे, उप मुख्य अभियंता मनोहर मसराम, अधिक्षक अभियंता रूपेन्द्र गोरे यांनी सर्व अधिकारी, विभाग प्रमुख,अभियंता, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.संचालक पाच सूत्री कार्यक्रमा अंतर्गत कमी कोळसा वापर, झिरो कोल डेमरेज, परिसरातील वातावरण सुधारणा व नवनवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याने पारस वीज केंद्राची उत्तरोत्तर यशस्वी वाटचाल होत आहे आणि महानिर्मितीमध्ये क्रमांक एकचे विद्युत केंद्र म्हणून या केंद्राचा नावलौकिक आहे.- डॉ.रविंद्र गोहणे , मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्र, पारस

 

टॅग्स :Paras Thermal Powerपारस वीज निर्मिती केंद्रAkolaअकोला