शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जिगरी’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 13:48 IST

अकोला: सिद्धी गणेश प्रॉडक्शनद्वारे मंगळवारी येथे घेण्यात आलेल्या पाचव्या विदर्भस्तरीय स्वातंत्र्य करंडक एकांकिका स्पर्धेत अमरावती येथील श्री वैष्णवी महिला व आदिवासी विकास संस्थेच्या ‘जिगरी’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. आश्रय प्रॉडक्शन, अमरावतीच्या ‘अनुरागम’ला द्वितीय, तर नागपूर येथील सी.पी. बेरार महाविद्यालयाच्या ‘अनोळखी ओळख’ या एकांकिने तृतीय क्रमांक पटकावला.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ...

ठळक मुद्देस्वातंत्र्य करंडक स्पर्धा : ‘अनुरागम’ला द्वितीय क्रमांक

अकोला: सिद्धी गणेश प्रॉडक्शनद्वारे मंगळवारी येथे घेण्यात आलेल्या पाचव्या विदर्भस्तरीय स्वातंत्र्य करंडक एकांकिका स्पर्धेत अमरावती येथील श्री वैष्णवी महिला व आदिवासी विकास संस्थेच्या ‘जिगरी’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. आश्रय प्रॉडक्शन, अमरावतीच्या ‘अनुरागम’ला द्वितीय, तर नागपूर येथील सी.पी. बेरार महाविद्यालयाच्या ‘अनोळखी ओळख’ या एकांकिने तृतीय क्रमांक पटकावला.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली जोशी, परीक्षक व अभिनेता योगेश सोमन, दिग्दर्शक यतीन मांझिरे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेअंतर्गत ११ एकांकिका सादर करण्यात आल्या. सायंकाळी माजी महापौर मदन भरगड, पीडीकेव्ही कौन्सिल सदस्य गोपी ठाकरे, ज्येष्ठ रंगकर्मी रमेश थोरात यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी सर्वोत्कृष्ट एकांकिका पुरस्कारासह इतर वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयोजक सचिन गिरी यांनी आभार प्रदर्शन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनिल कुळकर्णी, उदय दाभाडे, अक्षय पिंपळकर, मयूर भालतिलक यांनी परिश्रम घेतले. अकोल्यातील नाट्यकर्मी मधू जाधव, अशोक ढेरे, बालचंद्र उखळकर, डॉ. सुनील गजरे, विष्णू निंबाळकर, अरविंद कुळकर्णी यांच्यासह रसिक प्रेक्षकांनी दिवसभर एकांकिकांचा लाभ घेतला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, डॉ. प्रा. संतोष हुशे यांनी सदिच्छा भेट दिली.