शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वंचित शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्याचा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 14:30 IST

धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लवकरच धान्याचा लाभ देण्यात येणार आहे.

- संतोष येलकर अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यात धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लवकरच धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पुरवठा विभागामार्फत १५ जुलैपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत ज्या शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ मिळत नाही, अशा सर्व पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचे वितरण सुरू करण्यासाठी १५ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत विशेष मोहीम राबवून धान्याच्या लाभापासून वंचित शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश पुरवठा मंत्र्यांनी २८ जून रोजी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे दिले. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींना लवकरच धान्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.विशेष मोहिमेत प्रलंबित अर्जांचा होणार निपटारा!पुरवठा विभागामार्फत १५ जुलै ते १५ आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणाºया विशेष मोहिमेत धान्याचा लाभ सुरू करण्यासंदर्भात शिधापत्रिकाधारक लाभार्थींनी केलेल्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे. प्रलंबित अर्जांचा निपटारा केल्यानंतर पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.जिल्हा पुरवठा विभागात स्थापन होणार विशेष कक्ष!धान्याच्या लाभापासून वंचित लाभार्थींना धान्याचा लाभ देण्यासाठी राबविण्यात येणाºया विशेष मोहिमेत राज्यातील जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात विशेष संगणक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या विशेष कक्षामार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थींचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.धान्याच्या लाभापासून वंचित शिधापत्रिकाधारक लाभार्थींना धान्याचा लाभ देण्यासाठी १५ जुलै ते १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात येत आहे. या कक्षात तात्पुरत्या स्वरूपात ३८ संगणक आॅपरेटर्सची नियुक्ती करण्यात येत असून, शिधापत्रिकाधारक लाभार्थींच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे.-बी. यू. काळे,जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना