शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांसाठी लाभार्थीही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:38 IST

अकोला: प्रधानमंत्री आवास योजनेतून चालू वर्षात ८,४२६ घरकुलांचा लक्ष्यांक असला तरी त्यासाठी आतापर्यंत ४,0६८ एवढीच लाभार्थी नोंदणी झाली आहे. उर्वरित घरकुल लाभार्थींकडून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव होत नसल्याने ते घरकुल घेण्यासाठी लाभार्थी शोधण्याची वेळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेवर आली आहे.

ठळक मुद्देपन्नास टक्के घरकुलांसाठी लाभार्थींची कागदपत्रेच मिळत नाहीतस्वमालकीची जागा हाच मोठा अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्रधानमंत्री आवास योजनेतून चालू वर्षात ८,४२६ घरकुलांचा लक्ष्यांक असला तरी त्यासाठी आतापर्यंत ४,0६८ एवढीच लाभार्थी नोंदणी झाली आहे. उर्वरित घरकुल लाभार्थींकडून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव होत नसल्याने ते घरकुल घेण्यासाठी लाभार्थी शोधण्याची वेळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेवर आली आहे.सर्वांनाच घरे, या संकल्पनेनुसार ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली आहे. योजनेसाठी २0११ मध्ये झालेल्या आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणातून लाभार्थींची संख्या निश्‍चित झाली आहे. जिल्हय़ात एकूण ६७ हजार लाभार्थी पात्र आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४,१९४ लाभार्थींना घरकुल मंजूर आहेत. त्यांची निवडही जिल्हास्तरीय समितीकडून झाली. त्यावेळी लाभार्थींची माहिती ऑनलाइन करण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी थेट जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयातच बसणे सुरू केले होते. त्यानंतर शासनाने नव्याने ४,३१५ घरकुल लाभार्थी निवडीला मंजुरी दिली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त पत्रानुसार चालू वर्षात ८,४२६ घरकुलांचा लक्ष्यांक आहे. जातीनिहाय सर्व्हेक्षणातील प्रपत्र ‘ब’ मध्ये शासनाने घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी यादी आधीच तयार केली आहे; मात्र त्या लाभार्थींची नावे ऑनलाइन करून त्यांना अनुदान वाटप करण्यासाठी कागदपत्रे अद्यापही सादर झालेली नाहीत. घरकुलांसाठी असलेल्या अटींची पूर्तता करणे हजारो लाभार्थींना अशक्य झाले आहे. यादीत नाव असतानाही कागदपत्रेच सादर होत नसल्याचे ग्रामसेवकांनी आढावा बैठकीत सांगितले आहे. त्यामुळे योजना अत्यंत संथगतीने सुरू आहे. नोव्हेंबर अखेर घरकुलांना मंजुरी न मिळाल्यास जिल्हय़ाचे उद्दिष्ट इतर जिल्हय़ात वळते होण्याची भीती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुभाष पवार यांनी व्यक्त केली आहे. लाभार्थींंनी आवश्यक कागदपत्र २0 नोव्हेंबरपर्यंत पंचायत समितीमध्ये सादर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे. 

स्वमालकीची जागा हाच मोठा अडसरघरकुलाचा लाभ घेण्यासाठी गावात स्वमालकीची जागा असल्याशिवाय तो मिळतच नाही. त्यामुळे ज्यांची नावे सामाजिक सर्व्हेक्षणाच्या प्रपत्र ‘ब’ मध्ये आहेत. त्यांच्या नावे जागा असणार्‍यांची संख्या फारच कमी आहे. त्यापैकी शेकडो लाभार्थी शासकीय जागेत राहतात. पूर्वी इंदिरा आवास योजनेतील घरकुलांमध्ये राहतात, त्यांनाही मालकीच्या जागेचा पुरावा मिळत नसल्याने वंचित ठेवले जात आहे. 

जनधनचे खातेही चालत नाहीलाभार्थींंना घरकुलाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये बँकेत खाते असणे अनिवार्य आहे; मात्र ते जनधनचे असू नये, अशीही अट आहे. लाभार्थींंना जॉब कार्ड, आधार कार्डसह फाइल तयार करावी लागत आहे.त्यानुसारच लाभ दिला जात आहे.