शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात लाभार्थ्यांना कोविशिल्डचा दुसरा डोस मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 10:20 IST

Corona Vaccine : लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस मिळणे अशक्य झाले आहे.

ठळक मुद्देसाठा संपल्याने जिल्ह्यातील १३८ केंद्र बंद दिवसभरात केवळ १३०० जणांना मिळाली लस
अकोला : जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ कोव्हॅक्सिनचा साठा शिल्लक असून, हा साठाही हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे, तर दुसरीकडे कोविशिल्ड लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस मिळणे अशक्य झाले आहे. लसींअभावी जिल्ह्यातील १३८ केंद्र बंद झाले असून, अनेकांना लस न मिळाल्याने लसीकरण केंद्रावरून परतावे लागल्याचे चित्र रविवारी पाहावयास मिळाले. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातल लसीकरणासाठी १५३ केंद्र सुरू करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्याला मागणीएवढा लसीचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे कोविशिल्डचा उपलब्ध साठा संपला असून, कोव्हॅक्सिनचा साठाही हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरणाची सुरुवात कोविशिल्ड लसीने झाली होती. त्यामुळे बहुतांश लाभार्थ्यांना लसींचा दुसरा डाेस घ्यावा लागणार आहे, मात्र कोविशिल्ड लस उपलब्धच नसल्याने अशा लाभार्थ्यांना दुसरा डोस मिळणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या डोससाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रविवारी केवळ १५ केंद्रांवर कोविड लसीकरण झाले असून, केवळ १३०० लाभार्थ्यांना लस मिळाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.दाेन दिवसांत लसीकरण ठप्प पडण्याची शक्यताजिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरू झालेले कोविड लसीकरण मोहीम केव्हाही ठप्प पडण्याची शक्यता आहे. उपलब्ध लसीचा साठा हळूहळू संपण्याच्या मार्गावर असून, दररोज काही भागातील लसीकरण केंद्र बंद पडत आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील लसीकरण मोहीम पूर्णत: बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAkolaअकोला