केळीवेळी: स्थानिक हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार हरिदास भदे यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी रात्री ७.३0 वाजता थाटात करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेला रीतसर प्रारंभ झाला. ही स्पर्धा २४ जानेवारीपर्यंत खेळविली जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, ह.भ.प. पंढरीनाथ महाराज, अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष एस.आर. शाहू, महादेवराव भुईभार, तेजराव थोरात, मनोहरराव शेळके, जितू ठाकूर, चतरकर, हनुमान क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक गजानन दाळू गुरुजी, गणेशराव पोटे, मधुकरराव आढे, देविदास मोठे, मतलबभाई मौलाना, डॉ. अशोक मोंढे, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष मुकुंदराव बकाल, गजानन नळे, जिल्हा परिषद सदस्य शोभा शेळके आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना खासदार धोत्रे म्हणाले, केळीवेळी या गावाने कबड्डी खेळाला जिवंत ठेवण्याचे मोलाचे काम केले आहे. येथे दर तीन वर्षांनी कबड्डीच्या राज्यस्तरीय स्पर्धां घेण्यात येत असून, यावर्षी तेराव्यांदा हे सामने होत आहेत. हे सातत्य आयोजकांनी व ग्रामस्थांनी कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात उद्घाटक हरिदास भदे, रणधीर सावरकर, जितू ठाकूर, महादेवराव भुईभार यांनी मार्गदर्शन केले.
कबड्डी स्पर्धांना जंगी सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 02:13 IST