शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात प्रकट दिन महोत्सवास सुरुवात

By admin | Updated: February 12, 2017 00:33 IST

श्रींच्या प्रकट दिनोत्सवाची सुरुवात ११ फेब्रुवारी रोजी महारुद्र स्वाहाकार यज्ञाने करण्यात आली.

शेगाव, दि. ११- श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या १३९ व्या प्रकट दिनोत्सवाची सुरुवात ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वा. महारुद्र स्वाहाकार यज्ञाने विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांच्या हस्ते करण्यात आली.श्रींच्या प्रकट दिनोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले. यात काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ यासोबतच ११ रोजी सकाळी १0 वा. महारुद्र स्वाहाकार आरंभ विश्‍वस्त त्रिकाळ यांच्या हस्ते वैदशास्त्र संपन्न मथुरादास नारायणदेव चौथाईवाले राक्षस भुवन व १४ ब्राह्मणाद्वारे सुरुवात विधिवत पूजनाने करण्यात आली. ११ ते १८ पर्यंत वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांच्या हस्ते मंत्रोच्चारात यज्ञ पूजन केले जाणार आहे. १८ रोजी स.१0 वा. यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व विश्‍वस्त मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णाहुती व अवभृतस्नान होईल. तसेच दु.२ वा. श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज अश्‍वासह नगर परिक्रमा निघणार आहे. तसेच १९ रविवार रोजी जगन्नाथबुवा म्हस्के, मुंबई यांचे सकाळी ७ ते ८ काल्याचे कीर्तन होईल. ११ ते १८ फेब्रुवारीपर्यंत काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू झाले आहेत. दर्शनाची भक्तांसाठी व्यवस्थामंदिर परिसरात गर्दी होईल हे लक्षात घेऊन वनवे (एकेरी मार्ग) करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्री मुख दर्शनबारी, महाप्रसाद श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग व तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे.निवास व्यवस्थाश्री मंदिर परिसर भक्त निवास १ व २, भक्तनिवास संकुल ३, ४, ५ व ६ तसेच आनंद विहार संकुल परिसर, आनंद विसावा याठिकाणी भक्तांसाठी निवास व्यवस्था अल्पदरात करण्यात आली आहे. १८ फेब्रुवारी रोजी हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचे सकाळी १0 ते १२ शेगावी श्रींच्या प्रागट्यानिमित्त कीर्तन होईल. उत्सव काळात भक्तांच्या सोयीसाठी सर्वतोपरी उपलब्ध आहे.