शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मूग, उडिद खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 12:58 IST

अकोला: शासनाकडून हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणीला मंगळवारी चार केंद्रावर सुरूवात झाली. पहिल्या दिवशी चारही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूरळक प्रमाणात शेतकºयांनी उपस्थिती दाखवली.

अकोला: शासनाकडून हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणीला मंगळवारी चार केंद्रावर सुरूवात झाली. पहिल्या दिवशी चारही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूरळक प्रमाणात शेतकºयांनी उपस्थिती दाखवली.जिल्ह्यात अल्प पावसाचा तर इतरत्र अति पावसाचा फटका बसल्याने मूग, उडिदाचे पीक राज्यभरात नसल्यासारखेच आहे. त्यातही जे हातात आले, त्याची खरेदी मातीमोल भावाने करत व्यापाºयांनी शेतकºयांना नागवणे सुरू केले. त्यावर उपाय म्हणून शासनाने हमीभावाने मूग, उडीद खरेदी ३ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचे पणन विभागाला सांगितले. त्यानुसार तालुका खरेदी-विक्री संस्थेकडून कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्रात खरेदी होणार आहे.ही खरेदी सुरू होण्यापूर्वी शेतकºयांची नोंदणी केली जाणार आहे. या खरेदीसाठी महसूल मंडळ स्तरावरील पीक कापणी प्रयोगांच्या उत्पादकतेची आकडेवारी प्रमाण ठरवण्यात आली. ३ आॅक्टोबरपासून खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू झाली. त्यानुसार शेतकºयांना मूग, उडीद विक्री करण्यासाठी बाजार समितीच्या केंद्रात आॅनलाइन माहिती द्यावी लागत आहे. त्यामध्ये जमिनीचा सात-बारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेतले जाईल. सात-बारामध्ये असलेली जमीन आणि त्यामध्ये असलेला पीक पेरा या आधारे शेतकºयांच्या उत्पादनाची मर्यादा ठरणार आहे. तेवढ्या क्विंटलची खरेदी केंद्रात केली जाईल. जिल्ह्यात मूग, उडीद खरेदीसाठी पणन महासंघाने अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या चार केंद्रांवर सोय केली आहे. त्या ठिकाणी खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नोंदणी केलेल्या शेतकºयांचा एफएक्यू दर्जाच्या मूग, उडीद खरेदी केली जाईल.