शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश मांस जप्त; विक्री करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:23 IST

आयटीआयमध्ये गाडगेबाबा जयंती अकोला : येथील शासकीय आयटीआय (मुलींचे) येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य राम ...

आयटीआयमध्ये गाडगेबाबा जयंती

अकोला : येथील शासकीय आयटीआय (मुलींचे) येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य राम मुळे, गटनिदेशिका रेखा रोडगे, प्रशांत भोकाडे, अरविंद पोहरकर, एम. आय. खान, भालचंद्र दिगंबर, मनोरमा भारसाकळे, सावरकर आदी उपस्थित होते. यावेळी मुळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.

भाजप कार्यालयात गाडगेबाबांना अभिवादन

अकोला : येथील भाजप कार्यालयामध्ये संत गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, तेजराव थोरात, दिलीप जोशी, महापाैर अर्चना मसने, किशोर पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आरडीजी’मध्ये वक्तृत्व स्पर्धा

अकोला : आरडीजी महाविद्यालयात राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजचा प्रतीक ठाकरे याने प्रथम, कृषी महाविद्यालयाचा भास्कर शिवले याने द्वितीय, धुळ्याचा प्रसाद जगताप याने तृतीय क्रमांक मिळवला.

शिक्षकांची उपस्थिती; संभ्रम दूर करा!

अकोला : लाॅकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका जाहीर करून संभ्रम दूर करावा, अशी मागणी विज्युक्टाच्यावतीने डाॅ. बोरडे यांनी केली आहे.

जमावबंदी आदेशाची पायमल्ली!

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मात्र, या आदेशाची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणाही सक्रिय नसल्याचे दिसत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने!

अकोला : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे बँकेची अनेक कामे प्रभावित होत आहेत. ही परिस्थिती बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील शाखांमध्ये असल्याने मंगळवारी देशभरातील १,९०० शाखांसमोर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी नोकर भरतीची मागणी करत निदर्शने केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी बँकेच्या खासगीकरणाचाही निषेध केला. या धरणे आंदोलनाला फेडरेशनचे प्रवीण महाजन, श्याम माईनकर, अनिल मावळे, प्रदीप देशपांडे, अनिल बेलोकार, शुभांगी मानकर, शिल्पा ढोले, बाळासाहेब बोचे आदी उपस्थित होते.