शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अगरवेसचा शिकस्त भाग जमीनदोस्त

By admin | Updated: September 15, 2016 03:12 IST

दगडी पुलानजिकच्या अगरवेसचा शिकस्त भाग महापालिका प्रशासनाने बुधवारी जमीनदोस्त केला.

अकोला, दि. १४- दगडी पुलानजिकच्या अगरवेसचा शिकस्त भाग कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका प्रशासनाने बुधवारी शिकस्त भाग जमीनदोस्त केला. या मार्गावरील गणेश विसर्जन मिरवणूक ध्यानात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्यावतीने शहराच्या विविध भागातून परंपरेनुसार मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीला जय हिंद चौकातून सुरुवात होते. जय हिंद चौकातून दगडी पुलाजवळ येण्यापूर्वीच इतिहासकालीन असदगड किल्ल्याची वेस आहे. अगरवेस नावाने ओळखल्या जाणार्‍या या प्रवेशद्वाराची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली. त्यामध्ये झाडे उगवल्याने ही वेस कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करत असताना ही बाब जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त अजय लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या निदर्शनास आली. मिरवणुकीमध्ये ढोल-ताशे, बॅन्ड पथकांचा समावेश राहतो. त्यांच्या आवाजामुळे शिकस्त वेसचा भाग कोसळण्याची चिन्हं लक्षात घेता, शिकस्त भाग पाडण्यावर प्रशासकीय यंत्रणांनी एकमत केले. त्यानुषंगाने बुधवारी अगरवेसचा शिकस्त व जीर्ण भाग पाडून त्यामधील झाडे काढून घेण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त अजय लहाने जातीने उपस्थित होते. त्यांच्यासोबत डाबकी रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे, मनपाचे शहर अभियंता इक्बाल खान, कार्यकारी अभियंता अजय गुजर, क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.