शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मजुरांनी दिले धरणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST

अकोला : असंघटित नोंदणीकृत मजुरांच्या ऑनलाइन नोंदणी व नूतनीकरणाच्या प्रस्तावांना तातडीने स्वीकृती देण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी अकोला बिल्डिंग ...

अकोला : असंघटित नोंदणीकृत मजुरांच्या ऑनलाइन नोंदणी व नूतनीकरणाच्या प्रस्तावांना तातडीने स्वीकृती देण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी अकोला बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने असंघटित मजुरांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.

इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने अद्ययावत संगणकीकृत प्रणालीचा अवलंब करण्यात येत असल्याने, असंघटित मजुरांनी नोंदणी व नूतनीकरणाचे ऑनलाइन प्रस्ताव सादर केले. परंतु गत दहा महिन्यांपासून या प्रस्तावांची पडताळणी व स्वीकृतीचे काम प्रलंबित आहे. त्यामुहे नोंदणीकृत मजुरांच्या ऑनलाइन नोंदणी व नूतनीकरणाच्या प्रस्तावांना तातडीने स्वीकृती देण्यात यावी, नोंदणीकृत मजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रतिमहा पाच हजार रुपये निवृृत्तिवेतन देण्यात यावे, इएमआय आरोग्यदायी योजनेचा लाभ देण्यात यावा, घरकुलासाठी पाच लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी अकोला बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्यासह पंचशील गजघाटे, मदन वासनिक, सुनील तायडे, सतीश वाघ, भास्कर सोनोने, गजानन राऊत, संतोष सोळंके, सिद्धार्थ पाटील, जावेदखाॅ सुबेदारखाॅ, अहमदअली मर्दानअली, शेख नदीम शेख बबन, बशीरखान, उमेश अवचार, रघुनाथ रायबोले, राजू दामोदर, प्रकाश इंगळे, शेख मिराज शेख रहमान, संदीप नरवणे, उद्धव ढिसाळे, गोपाल पुंडकर, कल्पना सूर्यवंशी, अनुराधा ढिसाळे, सुनीता गजघाटे, कल्पना मेंढे, रेखा गेडाम, शीला तरोणे, कल्पना महल्ले, लता येनकर, सुनंदा ताजने, ज्योती प्रधान, अनिल येलकर, प्रशांत तिरपुडे आदी सहभागी झाले होते.

.................फोटो.................