शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या शूटिंगसाठी ड्राेन वापरणार असाल तर सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST

अकाेला : अकाेला शहर व परिसरात प्री - वेडिंग, वेडिंग शूटसाठी ड्रोनचा वापर अलीकडे वाढताना दिसत आहे. मात्र, ड्रोन ...

अकाेला : अकाेला शहर व परिसरात प्री - वेडिंग, वेडिंग शूटसाठी ड्रोनचा वापर अलीकडे वाढताना दिसत आहे. मात्र, ड्रोन उड्डाण करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. ड्रोनचा वापर करावयाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, या नियमांचे पालन न केल्यास ड्राेन चालकासह संबंधितांवर फाैजदारी कारवाई हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्नाच्या शूटिंगसाठी ड्राेन वापरणार असाल तर आता सावधान हाेण्याची गरज आहे. उत्कृष्ट छायाचित्रणासाठी प्री - वेडिंगच्या शूटिंगकरिता ड्रोनच्या वापरास प्राधान्य दिले जाते. ड्रोनद्वारे शूट केलेले व्हिडिओ चांगल्या दर्जाचे येत असल्याने त्याला पसंती दिली जात आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या नैसर्गिक ठिकाणांसह प्राचीन मंदिरांचा परिसर, अभयारण्य तसेच घाटमार्गाला यासाठी पसंती दिली जात आहे. दरम्यान, ड्रोन वापरण्यापूर्वी काही नियमांची माहिती असणे आवश्यकच आहे. पाेलिसांकडून याबाबत अद्याप तरी अधिसूचना काढण्यात आलेली नसली तरी ड्रोनचा वापर करण्याअगोदर ‘डीजीसीए’च्या (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) नियमानुसार जवळच्या पोलीस ठाण्याला लेखी पूर्वकल्पना देणे आवश्यकच आहे.

ड्रोन उडविण्यासाठी प्रमाणपत्र हवे

१ ड्रोन उडविण्याकरिता सर्वप्रथम डीजीसीएच्या मान्यताप्राप्त केंद्राकडून आठवडाभराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

२ प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या संस्थेकडून प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्या आधारे ड्रोन उड्डाण करता येऊ शकताे.

३ परवाना प्राप्त होईपर्यंत प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती प्रमाणपत्राच्या आधारे ड्रोनचा वापर सुरू ठेवू शकते.

४ विना प्रशिक्षण, विना परवाना ड्रोन उडविणे अवैध असून, पोलिसांकडून कारवाईदेखील केली जाऊ शकते.

वापरण्याचेही नियम

संरक्षण खात्याशी संबंधीत सर्व केंद्रांचा परिसर सुमारे तीन किलोमीटरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला असतो.

सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील धरणांच्या परिसरात ड्रोन वापरण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

विमानतळाच्या परिसरात तसेच हवाई धावपट्टीच्या भागातसुध्दा ड्रोन वापरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे.

ड्रोनचा प्रकार व ड्रोन उड्डाण करणाऱ्या पायलटची डीजीसीएकडे नोंदणी प्रशिक्षण आवश्यक आहे.

नॅनो ड्रोन हा केवळ ५० फूट अर्थातच १५ मीटर उंचीपेक्षा जास्त उडविता येत नाही. तसे केल्यास नियमाचा भंग ठरतो.

मायक्रो ड्रोन हा २०० फूट (६० मीटर) उंचावरच उडविता येतो, त्यापेक्षा जास्त उंचीवर उडविणे अवैध ठरते.

असे आहेत ड्रोनचे प्रकार

नॅनो- ० ते २५० ग्रॅमपेक्षा कमी वजन.

मायक्रो २५१ ग्रॅम ते २.५ किलोपर्यंत वजन.

स्मॉल २५ किलोपर्यंत वजन, मीडियम २५ ते १५० किलोपर्यंत वजन.

लार्ज १५० किलोपासून पुढे

ड्रोन उड्डाणापूर्वी डीजीसीए मान्यताप्राप्त कंपनीकडून प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. आठवड्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर या संस्थेकडून प्रमाणपत्र दिले जाते. ड्रोनचा वापर हा कायद्यानेच करायला हवा. रेड, ऑरेंज, ग्रीन झोन विचारात घ्यावे. ड्रोन केवळ ग्रीन झोनमध्येच उडविला जावा. संवेदनशील क्षेत्रात कोठेही ड्रोनचा वापर करू नये, जेणेकरून सुरक्षिततेचा मुद्दा निर्माण होईल.

जी. श्रीधर

पाेलीस अधीक्षक, अकाेला

पाेलिसांच्या विविध संस्थांच्या हद्दीत संरक्षण खात्याशी संबंधीत तसेच पोलीस खात्याशी संबंधीत विविध आस्थापनांचे संवेदनशील क्षेत्र अस्तित्त्वात आहे. यामुळे अशा हद्दीत ड्रोनचा वापर करणे कटाक्षाने टाळायला हवे. ड्रोनचा वापर करण्यापूर्वी जवळच्या पोलीस ठाण्याला लेखी कल्पना देणे आवश्यक आहे. डीजीसीएकडून परवानगी घेऊनच ड्रोन उड्डाण करावे.

माेनीका राऊत

अपर पाेलीस अधीक्षक, अकाेला