शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते तुमचीसुद्धा आर्थिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : सध्या सण-उत्सवाचा काळ असून, या फेस्टिव्हल सीझनमध्ये विविध ऑफर्स घेऊन लहान-मोठे व्यापारी बाजारात दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : सध्या सण-उत्सवाचा काळ असून, या फेस्टिव्हल सीझनमध्ये विविध ऑफर्स घेऊन लहान-मोठे व्यापारी बाजारात दाखल होत आहेत. त्यांचे उत्पादन विकले जावे म्हणून ते फेस्टिव्हल सीझनचा आधार घेऊन ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या ऑफर्स देत आहेत. अशातच दाखविले जाते वेगळे आणि मिळते भलतेच काही. तेव्हा फसवणूक झाल्याचे कळल्यावर अनेक जण सायबर पोलीस स्टेशनची पायरी चढताना दिसत आहेत.

कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्राला मरगळ आली आहे. यामध्ये लहान-मोठे व्यापारी आता त्यांची तूट भरून काढण्यासाठी विविध आकर्षक ऑफर्स देऊन ग्राहकांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा फसव्या ऑफर्सना सर्वसामान्य ग्राहक बळी पडत असून, त्यांची फसवणूक होत असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे अशा फसव्या जाहिरातींवर विश्वास न ठेवता खातरजमा करून वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. त्यामुळे खरेदी करताना जरा जपूचन करा असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

अशी होऊ शकते फसवणूक

कधी कधी बऱ्याच आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना फसविले जाते, तर काही वेळा चुकीची ऑर्डर देऊन फसवणूक केली जाते. या ऑफरमध्ये नमूद केलेल्या किंवा दर्शविलेल्या ऑफर बऱ्याच वेळा चुकीच्या असतात. त्यांचा मुख्य हेतू लोकांना फसविणे हा असतो. यानंतर इतरही मार्ग आपल्यासाठी फसवणारे ठरू शकतात.

काही वेळा ग्राहकांना वस्तू दाखविण्यात येतात. मात्र, डिलेव्हरीआधीच ग्राहकांडून पैसे मागविले जातात. पैसे ऑनलाइन पद्धतीने मागवूनही, त्या ग्राहकांना वस्तू दिल्या जात नाहीत. तसेच काही वेळा पैसे घेऊन खराब किंवा बऱ्याच वेळा दुसऱ्याच वस्तू पाठविल्या जातात.

ही घ्या काळजी

माहितीच्या आणि विश्वासार्ह वेबसाइटवरून खरेदी करा, एसएसएल असलेल्या साइट्सद्वारेच खरेदी करा, कारण या वेबसाइट्स यूझर्सने इनपुट केलेला डेटा संग्रहित करण्यास अधिक सक्षम आहेत.

या साइट्स ओळखणे सोपे आहे, कारण त्या एचटीटीएऐवजी एचटीटीपीएसने सुरू होतात आणि त्यांच्या ॲड्रेस बारमध्ये लॉक पॅडलॉक चिन्ह असते.

वेबसाइटचे लुक्स बघून खरेदी करू नका. अनेकदा वेबसाइट दिसण्यास आकर्षक दिसते, मात्र यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.

जर तुम्हाला अशा साइट्स ओळखायच्या असतील, तर प्रोडक्ट्सच्या माहितीत आणि वेबसाइटवर शब्दांमध्ये तुम्हाला अनेक चुका आढळतील.

नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, खोट्या जाहिरातींकडे आकर्षित न होता कमी पैशात आणि कमी खर्चात मोठी वस्तू मिळत असेल तर त्याची खात्री करून घ्यावी, काही अनुचित प्रकार वाटत असल्यास सायबर पोलिसांशी संपर्क करा.

-

विलास पाटील

प्रमुख दहशतवादविराेधी कक्ष

ऑनलाइन फसवणूक

जानेवारी ३

फेब्रुवारी २

मार्च ३

एप्रिल ३

मे ४

जून २

जुलै ३

ऑगस्ट ४