शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओ बचुटेंच्या अटकेची शक्यता

By admin | Updated: June 12, 2016 02:45 IST

रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले अकोला पंचायत समितीचे तीन अधिकारी पोलिसांच्या रडारवर.

बोरगाव मंजू (जि. अकोला): महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले अकोला पंचायत समितीचे तीन अधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे. या तीनही अधिकार्‍यांनी उच्च न्यायालयातून २0 तारखेपर्यंत तात्पुरता जामीन प्राप्त केला आहे. या अपहार प्रकरणात या आरोपींची मोठी भूमिका आहे अशी माहिती पोलिसांच्यावतीने उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गटविकास अधिकारी देवीदास बचुटे यांच्या अटकेची शक्यता बळावली आहे. प्रकृती अस्वस्थेमुळे बचुटे रुण्णालयात दाखल असून या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयातून सुटी होताच बचुटे पोलिसांच्या ताब्यात असतील, अशी माहिती बोरगाव मंजूचे ठाणेदार भास्कर तवर यांनी दिली. सन २0१३ ते १४ या कालावधीत बोरगाव मंजू परिसरात नऊ शेतरस्त्याचे काम करण्यात आले होते. शासकीय निधीचा योग्य प्रकारे वापर व्हावा यासाठी सहायक कार्यक्रम अधिकारी आनंद जानोदकर व सहायक लेखाधिकारी गणेश कहार यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यावर जबाबदारी होती; मात्र जानोदकर व कहार यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे उघड झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. या अपहार प्रकरणात अकोला पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी बचुटे यांची भूमिका असल्यामुळे पोलिसांना त्यांना चौकशीसाठी बोलावले होते; मात्र रक्तदाब वाढल्याचे कारण करू न बचुटे रुग्णालयात दाखल झाले आहेत. या प्रकरणात आतापर्यंंत दोन अधिकार्‍यांना अटक झाली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.