शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कर्णबधिरांना मिळणार ‘डिजिटल क्लासरूम’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:21 IST

अकोला: कर्णबधिर मुलांसाठीच्या एकवीरा बाल विकास केंद्रात डिजिटल क्लासरूम कार्यान्वित करण्यासाठी युवाराष्ट्र व एमएसईबी अभियंता सह. पतसंस्थेच्यावतीने मदतीचा हात म्हणून रविवारी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

ठळक मुद्देयुवाराष्ट्र, एमएसईबी अभियंता पतसंस्थेचा ‘एकवीरा’ ला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्णबधिर मुलांसाठीच्या एकवीरा बाल विकास केंद्रात डिजिटल क्लासरूम कार्यान्वित करण्यासाठी युवाराष्ट्र व एमएसईबी अभियंता सह. पतसंस्थेच्यावतीने मदतीचा हात म्हणून रविवारी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. श्रीकांत व  सुचिता बनसोड हे कर्णबधिर मुलांसाठी उपचारप्रक्रिया व या मुलांमध्ये सर्वांंगीण क्षमतांचे निर्माण करून त्यांना सर्वांंगीण बाल विकासाच्या मुख्य धारेत आणण्याच्या उद्देशाने एकवीरा बाल विकास केंद्र चालवतात. बालकांमध्ये कर्णबधिरत्व हे लवकर लक्षात न येणारे वेगळ्या स्वरूपाचे व तेवढेच गंभीर व्यंग आहे. असे असले तरी त्वरित योग्य उपचार आणी विशेष प्रशिक्षण सुविधा लाभल्यास या मुलांना सर्वांंगीण विकासाकडे नेता येऊन स्वावलंबी बनवता येऊ शकते. मुलांच्या सर्वांंगीण विकासाच्या प्रक्रियेला हातभार लागावा म्हणून इथे द्रुकश्राव्य माध्यमातून शिक्षण देण्यासाठी डिजिटल क्लासरूम असावी, अशी भावना बनसोड दाम्पत्यांनी युवाराष्ट्रचे डॉ. नीलेश पाटील यांच्याकडे बोलून दाखविली होती. तेव्हा युवाराष्ट्रने एकवीराच्या या अनोख्या प्रयासाच्या सादेला प्रतिसाद देण्याचे ठरवले. याच प्रयासादरम्यान युवाराष्ट्रचे डॉ. नीलेश पाटील यांनी आपल्या सामाजिक बांधीलकीमध्ये अग्रेसर असलेल्या अकोल्यातील एमएसईबी अभियंत्यासह पतसंस्थेला या संबंधी पत्र लिहून योगदान देण्याची विनंती केली असता एमएसईबी अभियंता सह. पत संस्थेचे चेअरमन इंजि. संतोष खुमकर, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशनचे इंजि विनय शिंदे यांच्यासह पतसंस्था व असोशिएशनच्या सर्व पदाधिकार्‍यांनी या डिजिटल क्लासरूमसाठी आर्थिक तरतूद आपल्या सामाजिक बांधीलकी निधीतून करण्याची मान्यता दिली. एकवीरा संस्थेला भेट देऊन पतसंस्थेचे चेअरमन इंजि संतोष खुमकर,सबऑर्डिनेट इंजि.असोशिएशनचे इंजि. विनय शिंदे, व्यवस्थापक उल्हास गोतमारे युवाराष्ट्रचे डॉ. नीलेश पाटील यांनी कोटेशननुसार ७५ हजार रुपयांचा धनादेश संचालिका  सुचिता बनसोड यांच्यासह विद्यार्थ्यांंना बहाल केला. या निधीतून बाल विकास केंद्रात १५ ऑगस्ट रोजी डिजिटल क्लासरूम कार्यान्वित होणार आहे.