शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दसर्‍याला उडणार ‘खरेदी’चा बार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:52 IST

वाशिम: साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या दसर्‍याच्या मुहूर्तावर विविध वस्तूंची खरेदी केली जाते. यावर्षी वाहन व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा बाजार तेजीत असल्याचे तर सराफा बाजार ‘जैसे थे’ राहण्याचे संकेत आहेत. दरम्यान, दसर्‍यानिमित्त बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. 

ठळक मुद्देवाहन बाजार तेजीत सोने बाजार ‘जैसे थे’

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या दसर्‍याच्या मुहूर्तावर विविध वस्तूंची खरेदी केली जाते. यावर्षी वाहन व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा बाजार तेजीत असल्याचे तर सराफा बाजार ‘जैसे थे’ राहण्याचे संकेत आहेत. दरम्यान, दसर्‍यानिमित्त बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. सोनेरी दिवस म्हणून ओळख असलेल्या दसर्‍याला वाहन आणि सोने-चांदी खरेदीचा उत्तम मुहूर्त मानले जाते. गतवर्षी पाऊस बर्‍यापैकी होता. त्यामुळे सर्वच वस्तूंची बाजारपेठ तेजीत होती. यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्याने गतवर्षीसारखा सराफा बाजार तेजीत नसल्याचा दावा सराफा व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या दसर्‍याला ४0 टक्के उलाढाल कमी होण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तविला. दुसरीकडे वाहन बाजार व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा बाजार बर्‍यापैकी तेजीत राहण्याचा अंदाज वाहन विक्रेते व व्यावसायिकांनी वर्तविला. ऐन वेळेवर वाहन खरेदीत व्यत्यय येऊ नये म्हणून एका महिन्यांपूर्वीच ग्राहकांनी वाहनांची ‘बुकिंग’ करून ठेवल्याचे वाहन विक्रेते नकुल हुरकट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दसर्‍याच्या मुहूर्तावर गाडी घरी नेण्याचे नियोजन अनेकांनी अगोदरच करून ठेवले असल्याने  विक्रेत्यांना दसर्‍याच्या मुहूर्तावर गाडी देणे सोपे होणार आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

आरटीओ कार्यालय सुरू राहणारदसर्‍याच्या दिवशी शासकीय कार्यालयांना अधिकृत सुटी असते; मात्र याच दिवशी वाहनांची खरेदी मोठय़ा संख्येने होत असल्याने वाहन नोंदणी सुलभ व्हावी म्हणून शनिवार, ३0 सप्टेंबर रोजी वाशिमचे  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सुरू राहणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले.