शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
2
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
3
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
4
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
5
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...
6
घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर
7
Ganesh Visarjan: मुंबईमध्ये २२ वर्षांत पहिल्यांदाच मोजला नाही विसर्जनाचा ‘आवाज’
8
१०० रुपये ते ५० कोटींचा मालक... शुभमन गिल क्रिकेटशिवाय 'या' २० ठिकाणांहून कमवतो बक्कळ पैसा
9
मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!
10
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
11
उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश
12
'नेटवर्क्ड ब्लू वॉटर फोर्स'..! २०० हून अधिक युद्धनौका, पाणबुड्यांसह भारतीय नौदलाचा जबरदस्त प्लॅन
13
आजचे राशीभविष्य - ८ सप्टेंबर २०२५; गुंतवणूक करताना सावध राहा, वाणीवर संयम ठेवा!
14
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
15
...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका
16
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
17
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
18
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
19
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
20
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड

चिंब पावसात बाप्पाचे आगमन

By admin | Updated: August 30, 2014 01:37 IST

अकोल्यात रिमझीम पावसात गणेशाचे आगमन

अकोला : आकाशातून बरसत असलेला रिमझिम पाऊस, दिंडी, डिजे, ढोल- ताशांच्या गजरात जिल्हाभरात वाजत गाजत श्री गणरायाचे आगमन झाले. शहरात सकाळी ९ वाजतापासून तर दुपारी २.३0 वाजेपर्यंंत रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र, या पावसातही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शुक्रवारी लाडके बाप्पा वाजत-गाजत घरोघरी विराजमान झाले. शहरातील प्रमुख मार्गांंसह अनेक भागात गणेश मूर्तीची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण राज्यभरात साजरा होणारा व युवकांच्या उत्साहाला उधाण आणणार्‍या गणेशोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरांत बाप्पा विराजमान झाले. गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तांनी अकोला क्रिकेट क्लब, तापडियानगरातील भारत विद्यालयाजवळील मैदान, जय हिंद चौक, कौलखेड चौकात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंंत भाविक वाजत-गाजत गणेश मूर्ती घेऊन जात होते. गणेश मूर्तीसोबतच पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य व इतर पूरक साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. शहरातील गणेश मंडळे, घराघरांतील सदस्य, चिमुकले सायकलरिक्षा, ऑटोरिक्षा, कार, ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच सायकलवर वाजत-गाजत बाप्पांना घेऊन जात होते. गणरायाचा जयघोष आणि गुलाल, फुलांची उधळण करीत सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणूक काढली. सार्वजनिक गणेश मंडळांनी काढलेली गणरायाची मिरवणूक रात्री उशिरापर्यंंत सुरू होती. गणेश स्थापनेचा मुहूर्त दुपारी २.३0 वाजेपर्यंंत असल्यामुळे अनेक घरगुती गणेशाची सकाळीच स्थापना करण्यात आली. *बँड, दिंडी, ताशांच्या भावात वाढ गणेश स्थापनेच्या मिरवणुकीत मोठय़ा प्रमाणात दिंडी, ढोल ताशांचा उपयोग केल्या जातो. गणरायाची मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात येते. एका दिवसात वाजंत्री मंडळींना बरीच मागणी असते. महिनाभरापासून बॅन्ड पथक, बॅन्जो पार्टी, सनई-चौघडा वाजविणार्‍यांची गणेश मंडळांनी बुकिंग केलेली असते. मात्र काही मंडळे वेळेवर बॅन्ड पार्टी, ढोल-तासे सांगतात. यावेळी वाजंत्रीच्या भावात प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास आले. दोन ते तीन तास वाजविण्याचे पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत भाव वाढले होते. *मातीच्या मूर्तींचा तुटवडा, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींच खरेदीबाजारामध्ये मातीच्या मूर्तींच उपलब्ध नाहीत. काही दुकानांमध्ये मातीची मूर्ती मिळेल, असे फलक लावण्यात आले आहे. मात्र, त्या मूर्ती मातीच्याच आहेत, याची विश्‍वसनीयता नाही. त्यामुळे ग्राहकांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींंंनाच पसंती दिली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा, यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली. तरीदेखील गणेश भक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच खरेदी केल्या.