शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बोगस केळी रोप प्रकरणात ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:38 IST

अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना केळीची बोगस रोपे देणार्‍या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 

ठळक मुद्देलोकमतचा पाठपुरावा  शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशइंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश अकोटकर यांना ग्राहक मंचाने ठरवले दोषी

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना केळीची बोगस रोपे देणार्‍या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अकोटसह आंबोडा, बोर्डी येथील शेतकर्‍यांना इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक  रमेश अकोटकर आणि त्यांचे एजंट चंद्रकांत श्रीराम पालखडे व दिलीप सुखदेवराव अकोटकर यांनी शेतकर्‍यांना इंद्रायणी जी-९ या जातीचे दज्रेदार, देशातील पहिल्या क्रमाकांचे केळी टिश्यु कल्चर असल्याचे  सांगितले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी या रोपांची खरेदी केली होती. ही खरेदी करत असताना शेतकर्‍यांना विविध कंपन्यांच्या पावत्या देण्यात आल्या. शेतकर्‍यांनी शेती मशागत करून शेणखत, सेंद्रिय खत व इतर खर्च करून या रोपांची पेरणी केली होती. योग्य मशागत करूनही पिके चांगली आली नसल्याने शेतकर्‍यांनी इंद्रायणीचे संचालक व एजंट यांना शेतात येऊन मोकापाहणी करण्याची मागणी केली; मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शेतकर्‍यांनी कृषिमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, उपविभागीय अधिकारी आदींसह इतरांना निवेदन दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासन व प्रशासनाने तक्रार निवारण समितीची नियुक्ती केली होती. यामध्ये ५ कृषी तज्ज्ञ सदस्यांचाही समावेश होता. या समितीने प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन मोका पाहणी केली होती. तसेच त्यामध्ये शेतकर्‍यांचे ७0 टक्के केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला होता. या प्रकरणी शेतकर्‍यांनी ग्राहक मंचातही धाव घेतली होती. शेतकर्‍यांच्या याचिकेवर सुनावणी करीत ग्राहक मंचाने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना दोषी ठरवून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ३0 हजार व न्यायालयनीन खर्च ३ हजर असा ३३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत ही रक्कम शेतकर्‍यांना द्यावी लागणार आहे. रक्कम अदा न केल्यास ८ टक्के दराने व्याजदर लावावा, असेही ग्राहक मंचाच्या त्रिसदस्यीय पीठाने आपल्या निकालात म्हटले आहे. या प्रकरणी तक्रारकर्त्या शेतकर्‍यांच्या वतीने अँड. रवींद्र पोटे व अँड.एस.बी. पाटील यांनी काम पाहिले.