शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी बँकांकडून पुन्हा ‘आधार’ची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:11 IST

अकोला : शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी  बँक खात्यासोबत आधार लिंक करणे, त्याची पडताळणी कर ताना शेतकर्‍यांच्या नाकी नऊ आल्यानंतर काही बँकांनी पुन्हा  शेतकर्‍यांना आधार कार्डची झेरॉक्स जमा करण्याचे फर्मान  सोडले आहे. त्यामुळे अनेक बँकांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी होत  आहे.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी  ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात शेतकर्‍यांना प्रचंड त्रास झाला.  त्यासाठी आधी बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक करणे  आवश्यक करण्यात आले. 

ठळक मुद्देसर्वच खातेदारांकडून मागवले आधारस्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी  बँक खात्यासोबत आधार लिंक करणे, त्याची पडताळणी कर ताना शेतकर्‍यांच्या नाकी नऊ आल्यानंतर काही बँकांनी पुन्हा  शेतकर्‍यांना आधार कार्डची झेरॉक्स जमा करण्याचे फर्मान  सोडले आहे. त्यामुळे अनेक बँकांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी होत  आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी  ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात शेतकर्‍यांना प्रचंड त्रास झाला.  त्यासाठी आधी बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक करणे  आवश्यक करण्यात आले. त्यानंतर त्यावेळी सर्व्हर डाउन होणे, ही समस्या याच भागात  मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली. त्यातच पती-पत्नीचे आधार  क्रमांक आणि माहितीची पडताळणीसाठीही मोठय़ा अडचणींचा  सामना करावा लागला. काहींच्या हाताचे ठसे तर अखेरपर्यंतही  जुळले नाहीत. त्यांचे अर्ज ओटीपी पद्धतीने दाखल करण्यात आले. बँक खा त्याशी आधार क्रमांक लिंक नसलेले तसेच आधार क्रमांकांच्या  माहितीची पडताळणी न झालेल्या शेतकर्‍यांना बँकेत आधार  जमा करणे बंधनकारक करण्यात आले. त्याचवेळी ज्यांचे आधार खात्याशी लिंक आहे, माहितीची पड ताळणी झाली, त्यांनी ते बँकेत जमा करण्याची गरज नाही.  तरीही जिल्हय़ातील अनेक बँकांनी संबंधित गावांमध्ये दवंडी  िपटवली. त्यामध्ये सर्वच खातेदारांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत  शनिवारपर्यंत शाखेत जमा करण्याचे बजावण्यात आले. त्यामुळे  अनेक गावांतील शेतकर्‍यांचा गोंधळ उडालेला आहे. एकाच  दिवशी सर्व शेतकरी बँकेत धाव घेत असल्याचे चित्र पाहायला  मिळत आहे. 

स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेचा प्रतापउमरी परिसरातील स्टेट बँक कृषी विकास शाखेत सरसकट  सर्वच खातेदारांना आधार कार्ड आणण्याची सक्ती करण्यात  आली आहे. आधार क्रमांक खात्याशी लिंक असलेल्या शे तकर्‍यांनी याबाबत विचारणा केली असता झेरॉक्स प्रत देण्यात  तुम्हाला अडचण आहे का, असा प्रतिप्रश्न केला जात आहे. त्या  झेरॉक्सवर सात-बारातील शेतीचा गटक्रमांकही नोंदवून घेतला  जात आहे. या प्रकाराने हतबल झालेले शेतकरी शाखेत धाव घे त आधार कार्ड जमा करीत आहेत. 

बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असलेल्या शेतकर्‍यांनी  पुन्हा आधार कार्ड देण्याची गरज नाही. ज्यांचे अर्ज आधारची  पडताळणी न करता भरण्यात आले, त्यांनी व ज्यांचे बँक खा त्याशी आधार लिंकिंग झाले नाही, त्यांनीच आधार कार्ड जमा  करावे, बँकांनी सरसकट सर्वांचे आधार घेण्याची गरज नाही. - तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, अग्रणी बँक.