शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाच्या पुनर्गठनाकडे बँकांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 03:08 IST

सव्वा लाखावर शेतक-यांच्या कर्जाचे १५ मेपर्यंत पुनर्गठनावर प्रश्नचिन्ह.

अकोला: दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, पीक कर्ज पुनर्गठनाच्या कामात बँकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे १५ मेपर्यंत जिल्हय़ातील १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्ज थकीत असलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, यावर्षीच्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गत २६ एप्रिल रोजी घेतला. कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे १५ मे पर्यंंत पुनर्गठन करावयाचे निर्देश आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे तातडीने पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज वाटप करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेमार्फत जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँक व संबंधित बँकांना २८ एप्रिल रोजी देण्यात आले. त्यानुसार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, याबाबतची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने १0 मे पर्यंत जिल्हय़ात पीक कर्ज पुनर्गठनाचे काम केवळ २0 टक्क्यावर पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज पुनर्गठनाच्या कामाकडे बँकांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने पाच दिवसात (१५ मेपर्यंंत ) जिल्हय़ातील सर्व १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करण्याच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.