शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदारावर गुन्हा नोंदविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:18 IST

अकोला : जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेला गहाण ठेवलेले प्लॉट परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी एका कर्जदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार ...

अकोला : जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेला गहाण ठेवलेले प्लॉट परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी एका कर्जदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

जिजाऊ बँकेच्या अकोला शाखेतील थकीत कर्जदार डिगांबर भिकोजी पुरी (रा. सरस्वतीनगर, शेगाव) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने बँकेकडून ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामध्ये त्याने राहाते घर व खुले प्लॉट गहाण म्हणून बँकेकडे ठेवला होता. परंतु, सदर मालमत्तेपैकी पाच प्लॉट त्याने परस्पर विकले. यामुळे त्याच्याविरुद्ध बँकेने शेगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. तक्रारीनुसार, डिगांबर पुरी याने २०१६मध्ये शेगाव येथील शेत सर्व्हे नंबर ३९९ मधील प्लॉट नंबर ८५ ते ८९ अकोल्यातील जिजाऊ बँकेकडे गहाण ठेवून ६० लाखांचे कर्ज घेतले होते. आरोपीने बँकेला पूर्वसूचना न देता गहाण ठेवलेले प्लॉट १४ जुलै २०१६ रोजी परस्पर विकले. याप्रकरणी १५ एप्रिल २०२१ रोजी बँकेचे अकोला येथील सिव्हिल लाईन शाखाधिकारी प्रदीप काळे यांनी शेगाव शहर ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास पीएसआय निखिल इंगोले करीत आहेत.

बँकेची फसवणूक करणाऱ्या थकीत कर्जदारावर कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश नाशिरकर यांनी दिली. बँकेची फसवणूक ही आर्थिक गुन्हेगारी असून, अशा प्रकारे कृती करणाऱ्यास तथा कर्ज परतफेडीचे धनादेश देऊन बँकेत रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाई केली जाईल, असे सहकार खाते, पुणे प्रधिकृत वसुली अधिकारी मनीष बोडखे यांनी स्पष्ट केले.