शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे मानधन होणार बँकेत जमा!

By admin | Updated: July 3, 2017 01:54 IST

अकोला : राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यानुसार जुलै महिन्याचे मानधन त्यांना खात्यातच मिळण्याची तयारी झाली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन मिळण्यास २ ते ३ महिन्यांचा विलंब होत असल्याने त्यांची आर्थिक व मानसिक कुचंबणा होत होती. याची दखल घेत आयुक्तालयातील लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कनिष्ठ स्तरावरील मानधन वितरणाचे काम आयुक्त स्तरावर घेतले. त्यासाठी ते आवश्यक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या प्रणाली अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयामार्फत राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन एकत्रितरीत्या जुलै २०१७ पासून आधार संलग्न बँक खात्यात दरमहा थेट जमा करण्यात येणार आहे. राज्यपातळीवर दोन लाख कर्मचाऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट मानधन जमा करणारा एकात्मिक बालविकास सेवा योजना हा देशातील पहिला विभाग आहे. केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत महिला व बालविकास विभागाची योजना ग्रामीण, आदिवासी व शहरी भागात राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सहा महिने ते सहा वर्षे वयाच्या बालकांना पोषण आहार, आरोग्यसेवा पुरविणे, पूर्वशालेय शिक्षण देणे, तसेच बालमृत्यू कमी करणे, तीव्र कमी वजनाची जन्मलेली बालके, कुपोषित बालके यांच्या आरोग्य सुधारणेचा कार्यक्रम तसेच गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व महिला यांच्यासाठी आहार, आरोग्य व शिक्षणविषयक योजना राबविण्यात येतात.