शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो मजुरांच्या ‘आधार’ची बँक ‘लिंक’ पुढे सरकेना!

By admin | Updated: April 18, 2015 01:46 IST

आठ महिन्यांत राज्यात १३ लाख मजुरांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित.

अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या मजुरांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी जोडण्याची मोहीम गेल्या ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. १७ एप्रिलपर्यंंत राज्यातील ३0 लाख ४२ हजार ९४ मजुरांपैकी १२ लाख ९३ हजार २२६ मजुरांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) करण्यात आले. एकूण मजुरांच्या तुलनेत गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत आधार क्रमांकासोबत बँक खाते क्रमांक 'लिंक' करण्यात आलेल्या मजुरांचे प्रमाण बघता, रोहयो मजुरांच्या आधार बँक खात्याशी 'लिंक' करण्याचे काम पुढे सरकत नसल्याची बाब समोर येत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या जॉबकार्डधारक मजुरांच्या मजुरीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी, यासाठी रोहयो मजुरांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खाते क्रमांकासोबत संलग्नित करून, मजुरांना मजुरीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी रोहयो अंतर्गत जॉबकार्डधारक आणि मागील दोन वर्षांंत रोहयोचे काम केलेल्या मजुरांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकासोबत संलग्न करण्यासाठी शासनाच्या रोहयो विभागामार्फत गत ऑगस्टपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत १७ एप्रिलपर्यंंत राज्यातील १२ लाख ९३ हजार २२६ मजुरांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकासोबत संलग्नित करण्यात आले. राज्यात एकूण ३0 लाख ४२ हजार ९२ जॉबकार्डधारक मजूर असून, त्या तुलनेत गेल्या आठ महिन्यांत १२ लाख ९३ हजार २२६ मजुरांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी 'लिंक' करण्यात आले. त्यानुषंगाने रोहयो मजुरांच्या आधार क्रमांकासोबत बँक खाते क्रमांक 'लिंक' करण्याची मोहीम पुढे सरकत नसल्याचे चित्र दिसत आहे.