शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

‘वंचित’च्या ठिय्याचा दणका, ‘बीडीओ’ एकतर्फी कार्यमुक्त; जिल्हा परिषद ‘सीइओं’चा आदेश

By संतोष येलकर | Updated: July 12, 2024 22:18 IST

ग्रामसेविकाने लैंगिक शोषणाचे आरोप केल्याचे प्रकरण

संतोष येलकर, अकोला: जिल्हयातील एका ग्रामसेविकाने लैंगिक शोषणाचे आरोप केल्याच्या प्रकरणात अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालीदास तापी यांच्यावर कारवाइ करण्याची मागणी करीत, वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हयाच्यावतीने शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीइओ) दालनात ठिय्या देण्यात आला. कारवाइ होइपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेण्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने, अखेर गटविकास अधिकारी तापी यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी बी.वैष्णवी यांनी दिला.

महिनाभरापूर्वी एका ग्रामसेवक महिलेने लैंंगिक शोषणाचे आरोप केल्याप्रकरणी जिल्हयातील अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालीदास तापी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांच्याविरुध्द कारवाइ करण्यात टाळाटाळ करण्यात येत होती. दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी आणि जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. त्यावेळी तापी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतू त्यानंतर कारवाइ करण्यात आली नसल्याने, शुक्रवार १२ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्या कक्षात ठिया आंदोलन केले.

जोपर्यत कारवाइ होत नाही, तोपर्यत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. या पार्श्वर्भूमीवर अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालीदास तापी यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रधान सचिवांसोबत चर्चा केल्यानंतर दिला एकतर्फी कार्यमुक्तचा आदेश!

ठिय्या आंदोलनादरम्यान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांनी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या प्रधान सचिवांशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर गटविकास अधिकारी कालीदास तापी यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला.

टॅग्स :Akolaअकोला