शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कराचा बोजा कमी करण्यासाठी बाजोरिया सरसावले!

By admin | Updated: May 17, 2017 02:42 IST

पुनर्मूल्यांकनाचे आक्षेप निकाली काढण्यासाठी मनपात सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्रत्येक चार वर्षांनंतर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून दोन टक्के दराने सुधारित कर प्रणाली लागू करणे अपेक्षित असताना मनपा प्रशासनाने अकोलेकरांच्या मालमत्ता करात २८ ते ३० टक्के दरवाढ केली. ही बाब नियमबाह्य असून, कर कमी करण्याचा मुद्दा विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित करणार असल्याची भूमिका शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी घेतली. मागील १९ वर्षांपासून महापालिकेने शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकनच केले नाही. त्यामुळे मालमत्ता विभागाच्या दप्तरी केवळ ७४ हजार मालमत्तांची नोंद असली तरी पुनर्मूल्यांकन नसल्यामुळे कर प्रणालीत सुधारणा होऊ शकली नाही. यासाठी मनपातील भ्रष्ट प्रवृत्तीचे अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकदेखील जबाबदार होते. परिणामी मालमत्ता कराच्या बदल्यात मनपाचे उत्पन्न नगण्य होते. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी ‘जीआयएस’प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. नियुक्ती केलेल्या कंपनीने सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर मालमत्तांचे प्रत्यक्षात मोजमाप घेतले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या सभागृहात कराच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मालमत्ता करात २८ ते ३० टक्के दरवाढ केल्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरपासून अकोलेकरांना सुधारित कर प्रणालीच्या नोटीस जारी करण्याचे काम सुरू झाले. नोटिस जारी केल्यानंतर त्यावर आक्षेप नोंदवून प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. मनपाने प्रत्येक चार वर्षांनंतर दोन टक्के दरानुसार मालमत्ता कराची दरवाढ करणे अपेक्षित असताना अव्वाच्या सव्वा दरवाढ केली. ही बाब नियमबाह्य असून, यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित करणार असल्याची भूमिका आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी घेतली आहे. मागील १९ वर्षांपासून कराच्या रकमेत वाढ करण्यात आली नव्हती. ज्या इमारतींना कर लागू होता, तो अतिशय नगण्य होता. उदा. शहरातील हॉटेल व्यावसायिकांना २० हजार रुपये मालमत्ता कर लागू करणे अपेक्षित असताना तो केवळ ४ हजार रुपये होता. अशी अनेक प्रकरणे आहेत. ही सर्व मिलीभगत होती, असे दिसून आले आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार मनपाला आवश्यकतेनुसार करवाढ करण्याचे अधिकार आहेत. यामुळे शासनाकडून विकास कामांसाठी प्राप्त निधीत मनपाचा हिस्सा जमा करणे शक्य होणार असून, शहरात विकास कामांना गती मिळेल. ज्या मालमत्ताधारकांनी मागील अनेक वर्षांपासून कर चोरी केली, त्यांच्याकडून तो पूर्णपणे वसूल करण्यासाठी लवकरच नोटिस जारी केल्या जाणार आहेत. -अजय लहाने, आयुक्त, मनपा