आकोट : ताब्यात घेतलेली दुकाने परत करण्यासाठी खंडणी मागण्याच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना आकोट न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. खंडणी मागितल्याप्ररकणी भाजप नगरसेवक मंगेश चिखले, अशोक म्हसाळ, सागर बोरोळे तथा अन्य १० जणांविरुद्ध आकोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ५ जून रोजी सदर आरोपी आकोट न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मालविय यांच्या समक्ष हजर झाले. आरोपींची बाजू समजून घेऊन न्यायालयाने तीनही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपींतर्फे ॲड. थानवी अकोला यांनी काम पाहिल. आरोपींना जामीन मिळाला असला तरी अन्य १० जणांचा अद्याप शोध घेणे सुरू आहे. त्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, याबाबत नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त करण्यात येत आहे.
खंडणीप्रकरणी आरोपींना जामीन
By admin | Updated: June 6, 2014 01:18 IST