शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटनची वाढली क्रेझ

By admin | Updated: August 29, 2016 01:19 IST

अकोल्यात सहा ठिकाणी बॅडमिंटन सरावाकरिता सुविधा उपलब्ध.

अकोला, दि. २८: रिओमध्ये भारतीय कन्याच पुढे आल्यात. पी.व्ही.सिंधूनं बॅडमिंटनमध्ये पदक मिळवून, अखिल भारतातील मुलींना बॅडमिंटनचे वेड लावलं. पहाटे चार वाजल्यापासून या मुली कोर्टवर येतात. अकोल्यात रिओ ऑलिम्पिकपूर्वी तीस ते चाळीस मुली-महिला बॅडमिंटन कोर्टवर यायच्या. आता रिओनंतर बॅडमिंटनची क्रेझ वाढल्याने झपाट्याने प्रमाण वाढून ही संख्या साठपर्यंंत पोहोचली आहे. अकोल्यात सहा ठिकाणी बॅडमिंटन सरावाकरिता सुविधा उपलब्ध आहे. मित्र समाज क्लब, ऑफीसर्स क्लब, आयएमए हॉल, पीकेव्ही मैदान आणि वसंत देसाई क्रीडांगण बहूद्देशीय सभागृहामध्ये बॅडमिंटन खेळण्याची उत्तम सोय आहे. एकट्या वसंत देसाई क्रीडांगणावर ४५ मुली नियमित बॅडमिंटन सरावाकरिता येतात. येथे एकूण चार कोर्ट आहेत. अकोल्यातल्या ३0 मुली राज्यस्तर बॅडमिंटनपटू आहेत. तर प्राची ताथुरकर ही राष्ट्रीय खेळाडू आहे. प्रियंका पिल्ले हिने आखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. प्रियंका ही विद्यापीठ संघाची कर्णधार होती. अकोल्यात एका तपापूर्वी बॅडमिंटन बर्‍यापैकी खेळले जात होत; परंतु 'श्रीमंतांचा खेळ' पुरता र्मयादित राहिला. मित्र समाज क्लबने बॅडमिंटनचा सुवर्णकाळ बघितला आहे. मात्र, त्यानंतर पदाधिकार्‍यांमध्ये आपसी मतभेद झाल्याने मित्र समाज क्लबची इमारत आता एकटी पडली आहे. परंतु वसंत देसाई क्रीडांगणावर मात्र, आज भरगच्च बॅडमिंटनपटूंची गर्दी असते. एवढेच नव्हेतर जिल्हाधिकारी जी.श्रीकांतदेखील येथे नियमित खेळायला येऊन खेळाडूंना प्रोत्साहन देतात. सन २00५ पासून एनआयएस कोच निषाद डिवरे यांनी वसंत देसाई क्रीडांगण येथे बॅडमिंटन खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला केवळ पाच मुलीचं प्रशिक्षण घ्यायला यायच्या. आज मात्र, मुलांपेक्षा मुलींचीच संख्या जास्त आहे. नियमित ११ बॅचपैकी ६ बॅच केवळ मुलींच्या आहेत. येथे मुलींना नियमित फिटनेस ट्रेनिंग झाल्यानंतर बॅडमिंटन शिकविल्या जाते. येथे चार कोर्ट असून, नियमित सरावाकरिता पुरेसे आहे. पूर्वी श्रीमंतांचाच खेळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॅडमिंटन खेळात आता नॉयलॉनचे शटल आल्यामुळे सर्वसाधारण व्यक्ती हा खेळ खेळायला लागला आहे. हे शटलदेखील शंभर ते दीडशे रुपयाला मिळत असल्याने गरीब घरचे मुले-मुली हा खेळ खेळू शकत नाहीत. परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने करार पद्धतीने येथे प्रशिक्षण केंद्र चालविण्यास दिले असल्याने येथे अत्यल्प शुल्क आकारू न बॅडमिंटन प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे प्रशिक्षक निषाद डिवरे यांनी सांगितले.