शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवहारातील अधिकारी, कर्मचा-यांवर उगारणार बडगा

By admin | Updated: September 28, 2015 02:09 IST

वरिष्ठ अधिका-यांकडून कारवाई करताना होणारी चालढकल पाहता अशा अधिका-यांवरही आता शासनाने कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे.

किशोर खैरे/ नांदुरा(जि.बुलडाणा): सरकारी कार्यालयातील गैरकारभार, लाच प्रकरणातील कर्मचार्‍यांवर वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कारवाई करताना कथित स्तरावर केली जाणारी चालढकल पाहता अशा अधिकार्‍यांवरही आता शासनाने प्रसंगी कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे आता अधीनस्त कर्मचार्‍याला कारवाईपासून वरिष्ठ वाचवू शकणार नाहीत. सरकारी कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपत प्रकरणात, फसवणूक किंवा गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकल्याचे चौकशीत आढळून आल्यास त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार होते. प्रकरण न्यायालयात जाऊन तो दोषी आढळल्यास त्याच्यावर विनाविलंब कारवाईची तरतूद नियमात आहे; मात्र प्रकरणी कार्यवाही करताना प्रसंगी चालढकल झाल्याचे काही प्रकरणात शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जुलै २0१५ मध्ये एक निर्णय घेऊन अशा प्रकरणात थेट कारवाईचा बडगा उचलण्याचे संकेत दिले आहेत. सरकारी कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपत, फसवणूक किंवा गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकल्याचे चौकशीत आढळून आल्यानंतर त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली जाते. प्रकरण न्यायप्रविष्ट होऊन स्थानिक न्यायालयात त्याच्या विरोधात आरोप सिद्ध झाल्यास शिस्तभंगाची कारवाई अपेक्षित असते. अशा काही प्रकरणात कार्यवाही करताना मध्यंतरी दिरंगाई झाल्याचे समोर आले होते; पण आता तसे होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फौजदारी प्रकरणातील सुनावणीच्या तारखेला न्यायालयात उपस्थित राहून अशा प्रकरणाची सरकार वकिलाकडून माहिती आता वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे. न्यायालयाने कर्मचार्‍याला दोषी ठरविले असेल तर आदेशाची प्रत प्राप्त करून संबंधित कर्मचार्‍याने वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याच्या मुदतीच्या आधीच कर्मचार्‍यावरील कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करावा लागणार आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला तत्काळ वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली असेल तर त्यावरील सुनावणीची वाट न पाहता कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन कारवाईची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. लाचखोरीच्या प्रकरणात कर्मचार्‍यावरील आरोप सिद्ध झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यापूर्वी त्याने वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली आहे किंवा नाही, हे तपासणे आवश्यक राहणार आहे. वरिष्ठ न्यायालयाने कर्मचार्‍याच्या शिक्षेला स्थगिती दिली नसेल तर संबंधित दोषी कर्मचार्‍यावर कारवाई करणे बंधनकारक आहे. परंतु अनेक कार्यालयात वरिष्ठ अधिकारी दोषी कर्मचार्‍याप्रती सहानुभूती दाखवून बर्‍याचदा कार्यवाही करण्याचे टाळत असल्याची प्रकरणे समोर आली होती. त्यावर राज्याच्या समान्य प्रशासन विभागाने जुलै २0१५ मध्ये हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी बर्‍याच प्रकरणात खोट्या तक्रारी झाल्याचे निदर्शनास आले असून संपूर्ण शहानिशा क रूनच या प्रकरणी कार्यवाही केली जात असल्याचे स्पष्ट केले.