शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विषाणू संसर्ग उठतोय हिंस्त्र श्‍वापदांच्या जीवावर!

By admin | Updated: September 2, 2016 00:43 IST

महिनाभरात दोन बिबटांचा मृत्यू; अकोला-वाशिम वन विभागात उरले पाच बिबट.

अतुल जयस्वालअकोला, दि. १ : जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून होणारा विषाणू संसर्ग जंगलातील अतिसंरक्षित भागातील बिबटसारख्या हिंस्त्र श्‍वापदांच्या जीवावर उठत आहे. अकोला-वाशिम वन विभागातील मालेगाव परिक्षेत्रात गत महिनाभराच्या कालावधीत दोन बिबटांचा मृत्यू विषाणू संसर्गामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त होत आहेत.अन्न साखळीमधील सर्वोच्च पातळीवर वाघ, बिबट हे मार्जरवर्गीय प्राणी आहेत. या प्राण्यांचे अस्तित्व जंगलातील अन्नसाखळी संतुलीत राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जंगलातील वातावरण अत्यंत शुद्ध व प्रदूषणविरहित असल्यामुळे हे प्राणी सहजासहजी आजाराला बळी पडत नाहीत; परंतु जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून आता जंगलातील हिंस्त्र श्‍वापदांमध्ये विषाणू संसर्ग होत असल्याचे गत महिनाभरात झालेल्या घटनांमध्ये पुढे आले आहे. मालेगाव परीक्षेत्रामध्ये वाशिम जिल्हय़ातील कवरदरी शिवारात २५ जुलै रोजी अडीच वर्षाच्या बिबटाचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला. उपासमार व ट्रिपॅनोसोमा या घातक आजारांच्या विषाणूची लागण झाल्यामुळे या बिबटाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी याच परिक्षेत्रात कोळेगाव शिवारात तीन वर्षांची मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. गर्भार असलेल्या या मादीचा मृत्यूही विषाणू संसर्गामुळे झाल्याचे समोर आले. जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांना पावसाळय़ात विविध प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होऊन ती आजारी पडतात, अशी आजारी जनावरे जंगलात गेल्यास त्यांच्या माध्यमातून विषाणूंचा प्रसार होतो. यामुळे हिंस्त्र श्‍वापदांना विषाणूची लागण होण्याची दाट शक्यता असते. अकोला-वाशिम वन विभागात उरले पाच बिबटअकोला-वाशिम वन विभागात एकूण सात बिबट असल्याची माहिती आहे. यापैकी दोन बिबटांचा मृत्यू झाल्यामुळे आता केवळ पाच बिबटच शिल्लक आहेत. विषाणूंचा संसर्ग असाच होत राहिला, तर या पाच बिबटांचे अस्तित्वही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन्य जीव विभागाच्यावतीने जंगलालगतच्या गावांमध्ये पाळीव प्राण्यांचे लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.हिंस्त्र श्‍वापदांना विषाणू संसर्ग होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत घेऊन जंगलालगतच्या गावांमध्ये पाळीव प्राण्यांचे लसीकरण तसेच इतर उपाययोजना करू. - प्र. ज. लोणकरउप-वन संरक्षक, प्रादेशिक वन विभाग, अकोला.