शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बच्चन सिंग; संदीप घुगे यांची वर्षभरात बदली

By आशीष गावंडे | Updated: January 2, 2024 15:35 IST

बच्चन सिंग यांनी स्वीकारला पदभार, वाशिम जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना बच्चन सिंग यांनी गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न केले.

अकोला : जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची वर्षभरात शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागेवर बच्चन सिंग यांना पदस्थापना देण्यात आली आहे. शासनाने १ जानेवारी रोजी बच्चन सिंग यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केल्यानंतर आज मंगळवारी सिंग यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. 

वाशिम जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना बच्चन सिंग यांनी गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न केले. यासोबतच अंमलदारांचे कल्याण, सामाजिक कार्यात योगदान, नवनवीन पायाभूत सुविधांची निर्मिती करून जिल्ह्यात पोलिस दलाची प्रतिमा उंचावली होती. अवैध धंद्यांविरुद्ध प्रतिबंधक कारवाया करून वचक निर्माण केल्याचे चित्र होते. वाशिम येथून त्यांची बदली झाल्यानंतर ते पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. आता ते अकोला जिल्ह्याची सूत्रे सांभाळतील. 

दंगल उसळल्यामुळे नाराजीतत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची बदली झाल्यानंतर २२ ऑक्टोबर २०२२ रोजी संदीप घुगे यांची अकोल्यात नियुक्ती करण्यात आली होती. गत ऑक्टोबर महिन्यात त्यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. दरम्यान, मे २०२३ मध्ये अकोला शहरात दोन समुदायात दंगल उसळल्यानंतर त्यांच्या कामकाजाबाबत लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोलल्या जाते. घुगे यांची बदली केल्यानंतर त्यांना पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.