शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या सेवेतून नागरिकांचा त्रास टाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:42 IST

प्रत्येक क्षेत्रामध्ये सेवाकार्य कर्तव्याच्या भावनेतून करून नागरिकांना ‘स्वच्छता ही सेवा’ त्रासदायक होणार नाही, याकडे अधिकार्‍यांनी लक्ष देऊन कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी केले. अकोला भाजपातर्फे महानगरात ५४ ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमाचा व जिल्ह्यात १२८ ठिकाणी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमाच्या संकल्पांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. 

ठळक मुद्देखासदार संजय धोत्रे शहरात राबविली स्वच्छता मोहीम 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रत्येक क्षेत्रामध्ये सेवाकार्य कर्तव्याच्या भावनेतून करून नागरिकांना ‘स्वच्छता ही सेवा’ त्रासदायक होणार नाही, याकडे अधिकार्‍यांनी लक्ष देऊन कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी केले. अकोला भाजपातर्फे महानगरात ५४ ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमाचा व जिल्ह्यात १२८ ठिकाणी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमाच्या संकल्पांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, अनिल गावंडे, उपमहापौर वैशाली शेळके उपस्थित होत्या.यावेळी राहुल देशमुख, निकिता रेड्डी, सुनील राजे, डॉ. विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, धनंजय गिरीधर, डॉ. किशोर मालोकार, गीतांजली शेगोकार, दीप मनवाणी, सारिका जैस्वाल, राजेंद्र गिरी, मिलिंद राऊत, अमोल गोगे, नीलेश निनोरे, सुरेश अंधारे, उकंडराव सोनोने, चंदा शर्मा, हिरा कृपलानी, सुजाता अहिर, सुनीता अग्रवाल, शारदा ढोरे, सुमनताई गावंडे, पवन पाडिया, सतीश ढगे, सुनील क्षीरसागर, तुषार भिरड, विजय इंगळे, अजय शर्मा, माधुरी बडोणे, आम्रपाली उपर्वट, अनिता चौधरी, जयंत मसने, प्रशांत अवचार, नाना कुलकर्णी, आरती घोगलिया,अनिल गरड, आशिष पवित्रकार, प्रवीण जगताप, संदीप पाटील, अनिल नावकार, नीलेश ठेवा, अनुप गोसावी उपस्थित होते. शिवाजी पार्क, राजराजेश्‍वर मंदिर, बसस्थानक, भाजीबाजार, सिंधी कॅम्प प्रभाग १३, ५, ८, २0, १२ या भागात साफसफाई अभियान, वृक्षारोपण, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली. 

समाज निमार्णात सदैव कार्यरत राहू - शर्मा समाजसेवेचे व मानवतेचे व्रत जात-पात, पंथ, धर्म न पाहता, मन भेद न करता पक्षांनी दिलेल्या आदेशाला कोणाच्याही नेतृत्वात राष्ट्र व समाज निर्माणात कार्यरत राहू, असे आमदार शर्मा म्हणाले. प्रत्येक समाजाच्या कल्याणासाठी विकासाचा आलेख प्रधानमंत्री मोदी उंचावत असून, देशाची प्रतिमा विदेशातसुद्धा उंचावण्याची कृती त्यांनी केली आहे. त्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचा अभिमान आहे, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. यावेळी बबलू पळसकर, वसंत मानकर, सूरज शेळके, प्रमोद टेकाडे, सुजित ठाकूर, हंसराज सिसोदिया, वसंत बाछुका, कृष्णा शर्मा, उमेश गुजर, अभिजित गोलडे, अभिजित बांगर, लता गावंडे, राहुल गुजर, पंढरी दोरकर, गणेश श्रीनाथ, सतीश येवले, राम खरात, सुनील बाठे, सिद्धार्थ शर्मा, महेंद्र ओहेकर उपस्थित होते.