शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागानेच आपलेपण जपले - अविनाश सावजी

By admin | Updated: May 9, 2016 02:43 IST

पश्‍चिम व-हाडातील कर्तबगार शेतक-यांना रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार प्रदान.

अकोला : श्रीमती कशाला म्हणावी? घरदार मोठं याला की हृदयाच्या श्रीमंतीला? शहरात सहा खोल्यांचं घर असूनही तिसरी व्यक्ती सहन होत नाही; परंतु ग्रामीण भागात छोट्याशा घरात दहा व्यक्ती राहत असताना आजही तोच सन्मान केला जातो. म्हणूनच ग्रामीण भागातील माणसानं, शेतकर्‍यांनी आजही आपलेपण जपलं आहे. हे शिकण्यासाठीच शहरी मध्यमवर्गीय युवकांनी ग्रामीण भागाशी नाळ जोडावी, असे आवाहन प्रयास या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी यांनी रविवारी येथे केले. रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार सोहळ्य़ात ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ अकोला, जय गजानन कृषिमित्र परिवार व अकोला जिल्हा मराठा मंडळ यांच्यावतीने रविवारी मराठा मंडळ सभागृहात आयोजित सोहळ्यात यावर्षी अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील २५ महिला-पुरुष शेतकर्‍यांना रोटरी दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी रोटरी इंटरनॅशनलचे माती प्रातंपाल डॉ. नानासाहेब चौधरी होते. व्यासपीठावर डॉ. अविनाश सावजी, डॉ. पंदेकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले, मराठा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ, डॉ. रमेश वट्टमवार (औरगांबाद), रोटरीचे मानद सचिव सभापती शुक्ल यांची उपस्थिती होती. डॉ. सावजी यांनी प्रश्न निर्माण करण्यापेक्षा, उत्तर शोधण्याची गरज असल्याचे आपल्या भाषणात पुढे सांगितले. राज्यात दरवर्षी २00 कोटींची रद्दीची उलाढाल आहे. शहरात दररोज रद्दी जरी गोळा केली आणि विकली, तर एका-एका शहरातून लक्षावधी रुपये गोळा होतील. ती रक्कम शेतकरी, इतर सामजिक कामांसाठी वापरता येतील, असा सल्ला त्यांनी दिला.