अकोला : जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये शुक्रवारी सरासरी १२.८६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह शुक्रवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस बरसला. गहू, हरभरा, करडी या रब्बी पिकांसह कपाशी पिकासाठी हा पाऊस उपयुक्त ठरला. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील चार तालुक्यात सरासरी १२.८६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यात ७.0७ मि.मी., बाश्रीटाकळी तालुक्यात १६ मि.मी., बाळापूर तालुक्यात ५९ मि.मी. व पातूर ८ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.
सरासरी १२.८६ मि.मी.पाऊस
By admin | Updated: November 16, 2014 01:04 IST