शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोरिक्षात ‘प्रसूती’!

By admin | Updated: October 13, 2015 23:30 IST

चिखली ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार; वैद्यकीय अधिका-याने गर्भवती महिलेला हेतुपुरस्सर चुकीचा सल्ला दिल्याचा आरोप.

चिखली (जि. बुलडाणा): येथील ग्रामीण रुग्णालयात महिला वैद्यकीय अधिकार्‍यांनी गर्भवती महिलेला हेतुपुरस्सर चुकीचा सल्ला देऊन बाहेरचा रस्ता दाखविल्याने तिची प्रसूती ऑटोरिक्षात झाल्याने रुग्णालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.चिखली येथील रेश्माबी शेख मोहसीन या गर्भवतीची ग्रामीण रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.टी. खान यांनी तपासणी करून सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्यानुसार रिपोर्टवरून डॉ. खान यांनी प्रसूतीला आणखी दोन दिवस वेळ असल्याचे सांगून रेश्माबी यांना घरी नेण्याचा सल्ला दिला; परंतु घरी जाताच रेश्माबी यांना तीव्र प्रसूती वेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला पुन्हा सायंकाळच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ. खान यांनी पोटात पाणी कमी असल्याचे तसेच बाळाचे वजनही कमी असल्याचे कारण पुढे करून ह्यसिझरह्ण करण्याचा सल्ला दिला. यावेळी दोहोंच्या जिवाला धोका असल्याचे सांगून त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे सांगून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यास सांगितले व तसे पत्रही गर्भवतीच्या कुटुंबीयांकडून लिहून घेतले. दरम्यान, आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने सदर गर्भवती महिला रेश्माबींच्या कुटुंबीयांनी येथेच प्रसूती करा, अशी विनवणी डॉ. खान यांना केली; मात्र डॉ. खान यांनी या विनवणीला साफ धुडाकावून लावले. परिणामी डॉ. खान व रेश्माबीच्या नातलगांमध्ये शाब्दिक वाददेखील उद्भवला. शेवटी कुटुंबीयांनी रेश्माबी यांना हलविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ऑटोने जात असताना रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर तिची ऑटोरिक्षातच प्रसूती होऊन तिने एका गोंडस बाळाला नैसर्गिकरीत्या जन्म दिला. सद्य:स्थितीत नवजात शिशू व माता दोघांची प्रकृतीदेखील उत्तम असली तरी या घटनेने येथील ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला आहे. प्रसूतीनंतर रेश्माबीच्या नातलगांनी जाब विचारण्यासाठी ग्रामीण रुग्णालय गाठले असता तिथे त्यांचे पती डॉ. आरीफ खान यांनीदेखील उद्यामपणा दर्शवित अरेरावीची भाषा वापरल्याने वाद वाढला होता व पोलिसांना पाचारण करावे लागले होते. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीने वाद शमला असला तरी खान या डॉक्टर दाम्पत्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी रेश्माबीच्या कुटुंबीयांनी केली आहे.