शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोडीसीआर प्रणाली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:01 IST

अकोला : इमारत, घरे बांधण्याचा नकाशा मंजूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. केवळ प्रिंटर नादुरुस्त झाल्याच्या सबबीखाली मागील १७ दिवसांपासून ही प्रणाली ठप्प पडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यामुळे नकाशा मंजुरीचे काम थांबले असून, कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 

ठळक मुद्देनकाशा मंजुरीचे काम थांबलेकंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इमारत, घरे बांधण्याचा नकाशा मंजूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. केवळ प्रिंटर नादुरुस्त झाल्याच्या सबबीखाली मागील १७ दिवसांपासून ही प्रणाली ठप्प पडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यामुळे नकाशा मंजुरीचे काम थांबले असून, कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शहरात व्यावसायिक-रहिवासी इमारती असो किंवा घरे बांधण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर करणे क्रमप्राप्त ठरते. नगररचना विभागाकडे नकाशा मंजुरीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर पहिल्यांदा जोत्यापर्यंत (प्लिंथ) बांधकामाची परवानगी दिली जाते. जोत्यापर्यंत बांधकाम पूर्ण केल्यावर पुढील बांधकामासाठी पुन्हा नगररचना विभागाची परवानगी आवश्यक ठरते. यादरम्यान, नकाशा सादर करताना प्लॉटचे क्षेत्रफळ, कृषक-अकृषक असण्यासोबतच शिट क्रमांक आदी इत्थंभूत माहिती कागदोपत्री सादर करावी लागत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे प्रशासनाने नकाशा मंजुरीसाठी ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. ऑटोडीसीआर पद्धतीनुसार ऑनलाइन अर्ज सादर करणे भाग आहे. त्यासाठी मनपाने रीतसर आर्किटेक्ट,अभियंत्यांची निवड केली आहे. ऑटोडीसीआरचा कंत्राट पुणे येथील कंपनीला देण्यात आला आहे. प्रिंटर नादुरुस्त असण्याच्या सबबीखाली मागील १७ दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प पडली आहे. यामुळे गरजू नागरिकांच्या नकाशाची कामे अधांतरी सापडली आहेत. 

नगररचना विभागाचे नियंत्रण नाही!नगररचना विभागाच्या अखत्यारित काम करणार्‍या संबंधित कंपनीवर नगररचना विभागाचे नियंत्रण अपेक्षित आहे. याठिकाणी नेमका उलटा प्रकार दिसून येतो. केवळ एक प्रिंटर नादुरुस्त झाल्याचे कारण दर्शवित कंपनीने मागील १७ दिवसांपासून कार्यालयाचे कामकाज ठप्प केले आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

प्रिंटर नादुरुस्त झाले असेल, तर ते दुसर्‍याच दिवशी बदलणे अपेक्षित होते. १७ दिवसांपासून काम ठप्प असेल, तर कंपनी झोपेत असल्याचे दिसून येते. कंपनीची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. अकोलेकरांना होत असलेल्या मानसिक त्रासाचा कंपनीला खुलासा करावा लागेल. -विजय अग्रवाल, महापौर