शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मदतीने काकूने केली पुतण्याची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:17 IST

चंदन रामकरण केवट यांच्या तक्रारीनुसार आरोपी विशाल मुनीलाल केवट(२८) रा. कापशी रोड, चौफुलाबाई मुनीलाल केवट(५०) वर्ष यांच्यामध्ये शेतीबद्दल वाद ...

चंदन रामकरण केवट यांच्या तक्रारीनुसार आरोपी विशाल मुनीलाल केवट(२८) रा. कापशी रोड, चौफुलाबाई मुनीलाल केवट(५०) वर्ष यांच्यामध्ये शेतीबद्दल वाद सुरू होता. सदर प्रकरण दिवाणी कोर्टात न्यायप्रविष्ट होते. या शेतीपैकी काही शेती हायवे नंबर १६१ या महामार्ग चौपदरीकरणासाठी शासनाने अधिग्रहित केली आहे. त्या शेतीचा मोबदला म्हणून दोन कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले होते. त्यासंदर्भात दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. शेतीच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून १७ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास चंदन केवट यांचा भाऊ बंटी रामकरण केवट व आरोपी विशाल मुन्नीलाल केवट व चौफुलाबाई मुन्नीलाल केवट यांच्यात वाद झाला. आरोपींनी बंटी रामकरण केवट यास शिवीगाळ करून जबर मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या बंटी केवट याला कुटुंबीयांनी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी बंटी रामकरण केवट यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, ५०४(३४) नुसार गुन्हा दाखल करून आरोपी विशाल मुन्‍नीलाल केवट व चौफुलाबाई मुन्नीलाल केवट यांना अटक केली. पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय आव्हाळे पातुरात दाखल झाले असून, ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर इंगळे, अरविंद पवार, दिलीप मोडक, निलेश राठोड आदी तपास करीत आहेत.

शेतीच्या रकमेवरून सुरू होता वाद

महामार्गासाठी शासनाने केवट कुटुंबीयांची शेती अधिग्रहित केली. शासनाने त्यांना अधिग्रहित शेतीसाठी २ कोटी ४० लाख रुपये मोबदला मंजूर केला. त्यामुळे शेतीच्या पैशांतून दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू झाले. आरोपी विशाल केवट व काकू चौफुलाबाई केवट हे चंदन केवट व त्याचा भाऊ बंटी केवट यांना पैशांमध्ये वाटा मागत होते. यातूनच बंटी केवट याची हत्या करण्यात आली.